SHARE

अमरनगर- गोवंडी येथील वामन तुकाराम पाटील मार्गावर दुतर्फा रस्त्याचे काम महानगरपालिकेतर्फे चालू आहे. त्यामुळे या मार्गावर सध्या मोठी वाहतूककोंडी होत आहे. महानगरपालिकेने दोन महिन्यांपूर्वी येथील रस्त्याचे खोदकाम सुरु केले असून अजूनही काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यातच या रस्त्याच्या कडेला सीएनजी पंप असून येथे गॅस भरण्यासाठी रिक्षांच्या रांगा लागतात. त्यामुळे वाहतूककोंडीत अधिकच भर पडते. परिणामी पादचारी आणि शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे पालिकेने हे काम लवकरच पूर्ण करावे अशी मागणी येथील स्थानिकांकडून करण्यात आली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या