आता ट्रॅफिकला रेड सिग्नल

 Malad West
आता ट्रॅफिकला रेड सिग्नल

गोरेगाव - दिंडोशी परिसरातील रत्नागिरी हॉटेल ते वाघेश्वरी मंदिरासमोरील चौकात होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. वाहतुक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पालिकेनं सिग्नल यंत्रणा बसवण्याचं काम सुरू केलंय. मनसेचे उपविभाग अध्यक्ष धनंजय पानबुडे यांनी वाहतुक विभागाकडे यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर या वाहतुक विभागानं पी उत्तर पालिका विभागाला सिग्नल बसवण्यास परवानगी दिलीय. त्यानुसार पालिकेनं कामाला सुरुवात केलीय.

दिंडोशीतील रत्नागिरी हॉटेल ते वाघेश्वरी मंदिर परिसरातील रस्ता आधीच निमुळता आहे. त्यात या मार्गावर सिग्नल व्यवस्था नसल्यामुळे वाहनचालक बेशिस्तपणे वाहन चालवतात. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना सतत वाहतुक कोंडीला सामोरं जावं लागतं.

Loading Comments