Advertisement

अारेत ७ दिवसांत 'त्यांनी' लावली १४०० झाडे


अारेत ७ दिवसांत 'त्यांनी' लावली १४०० झाडे
SHARES

मुंबईत सध्या विकासकामांच्या नावाखाली झाडांची सर्रास कत्तल सुरू आहे. पर्यावरणप्रेमी या झाडांच्या कत्तलीला विरोध करत असले, तरी विकासकामांच्या नावाखाली त्यांचे कुणीही ऐकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे केवळ विरोध करत बसण्यापेक्षा पावसाळ्यात वृक्षारोपण करण्याचे ठरवत मालाडमधील पर्यावरणप्रेमींनी विद्यार्थ्यांच्या मदतीने आरे कॉलनीत ७ दिवसांत १४०० झाडे लावली आहेत.



मुंबई उपनगराचे हृदय अशी ओळख असलेल्या आरे कॉलनीतील झाडांची संख्या कमालीची घटली आहे. प्रदूषणाने मुंबईला बेहाल केले आहे. त्यामुळे मुंबईकरांना ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या आरेत अधिकाधिक झाडे लावावीत या विचाराने मालाडच्या 'अप्पर गोविंद नगर एएलएम'चे अध्यक्ष सुभाष राणे यांनी एक माेहीम छेडली.

या मोहिमेंतर्गत त्यांनी सोशल मीडियाद्वारे आरेत वृक्षारोपणाचे आवाहन नागरिकांना केले. त्यांच्या आवाहनाला साद घालत विविध कॉलेजातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आरे कॉलनी क्रमांक २५ परिसरात दररोज २०० या प्रमाणे २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान एकूण १४०० झाडे लावण्यात आली.




निर्सगाचे प्रेम हे वेड लावणारे असते. त्यामुळे निसर्गाला कुणी त्रास देत असेल, तर खूप वेदना होतात. 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवणारे सरकारही पर्यावरणाला धक्का पोहोचवण्याचे काम करत असल्याने निसर्गप्रेमी दुखावले आहेत. पण दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन ज्याप्रकारे १ हजारहून जास्त झाडे लावली, ते पाहून आनंदही होत आहे.
- सुभाष राणे, अप्पर गाेविंद नगर एएलएम


मी सोशल मीडियाच्या माध्यमातून या मोहिमेत सहभागी झालो. वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. झाडे नसतील, तर जगणेच कठीण होऊन जाईल. त्यामुळे युवकांनी अधिकाधिक संख्येने वृक्षारोपण केले पाहिजे.
- श्रीधर फडके, विद्यार्थी



हे देखील वाचा -

पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे वरळी हिलचे बाबुजी!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा