Advertisement

रुंदीकरणाच्या नावाखाली झाडं तोडण्याचा प्रस्ताव?


रुंदीकरणाच्या नावाखाली झाडं तोडण्याचा प्रस्ताव?
SHARES

खार - खार पश्चिम 13 वा रोड येथील रस्त्याच्या रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणासाठी काही झाडं तोडली जाण्याची शक्यता आहे. 13 वा खार रोड, चांगल्या स्थितीत असतानाही खोदण्यात आलाय. हा चार पदरी रस्ता आहे. दोन्ही बाजूंना वाहनांचं पार्किंग होतं आणि मधल्या दोन मार्गिकांवरून वाहतूक चालते. तरीही रुंदीकरणाच्या नावाखाली चांगला रस्ता खोदून रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडं तोडण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. त्यासाठी 29 झाडं तोडावी लागतील आणि पाच झाडं नव्यानं दुसरीकडे लावण्यात येतील. तशा नोटिसाही झाडांवर लावून नागरिकांच्या सूचना-हरकती मागवण्यात आल्या आहेत. वास्तविक, दोन झाडांमध्ये वाहनांचं पार्किंग झाल्यावर मधल्या भागात वाहतुकीसाठी पुरेशी जागाही आहे. तरीही झाडं तोडण्याचा घाट का घातला जातोय, असा प्रश्न स्थानिकांना पडलाय. झाडे तोडू नये अशी याचिकाही स्थानिकांनी कोर्टात केली आहे. 18 नोव्हेंबरला या याचिकेवर निर्णय अपेक्षित आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement