....हा पूल ठरतोय जीवघेणा

Bandra west
....हा पूल ठरतोय जीवघेणा
....हा पूल ठरतोय जीवघेणा
....हा पूल ठरतोय जीवघेणा
See all
मुंबई  -  

माहीम आणि वांद्रे या दोन्ही विभागांना लागून असलेला वांद्रे रेक्लेमेशन पूल दुचाकी चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. या पुलाची सुरक्षा भिंत कोसळली असून तेथील वळणही अत्यंत धोकादायक आहे. या ठिकाणी अनेकदा अंदाज चुकल्याने चालकांचा ताबा सुटून अनेक जीवघेणे अपघात याच ठिकाणी घडत आहेत. या ठिकाणचे पेव्हरब्लॉकसुद्धा निखळले असल्याने अपघात घडण्याची शक्यता आणखी वाढली आहे.

या समस्येत भर म्हणजे रात्रीच्यावेळी या पुलावर दिव्यांची सोय नसल्याने चालकांचा अंदाज हमखास चुकतो. या जीवघेण्या समस्येकडे सबंधीत विभागाचे लक्ष नसल्याची तक्रार विभागातील नागरिकांनी आणि दुचाकीस्वारांनी केली आहे. हा पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या आखत्यारीत येत असल्याने दुरुस्तीची जबाबदारी देखील एमएसआरडीसीचीच आहे. या समस्येची दखल घेऊन दिवे तसेच सेफ्टी बॅरिकेट तातडीने लावण्यात यावे. तसेच या पुलाची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी, ही मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

माहीमच्या स्थानिक नागरिकांनी वांद्रेच्या वरिष्ठ वाहतूक निरीक्षक मछिंद्र बोडके यांची सोमवारी भेट घेतली. मछिंद्र बोडके यांनी 8 महिन्यांपूर्वीच एमएसआरडीच्या वांद्रे कार्यालयात तक्रार करून अपघात रोखण्यासाठी नेट आणि जे वळण आहे त्या ठिकाणी सतत चमकत राहणाऱ्या सिग्नलची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

ज्या वळणावर गाड्या वळवल्या जातात त्या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. ज्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण जास्त आहे, त्या ठिकाणी नेट लावण्यात यावी, अशी मागणी देखील केली आहे. त्याचबरोबर सदर ठिकाणचे संबंधित अधिकारी या प्रकारची दखल घेत नसतील तर हा प्रकार मुख्यमंत्र्यांना देखील पत्राद्वारे कळवणार आहोत.

फारुख ढाला - समाजसेवक, स्थानिक नागरिक

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.