Advertisement

घरात झाला टीव्हीचा स्फोट; थोडक्यात बचावले मायलेक

मुंबईतील कांदिवली पूर्वेतील पोईसर भाजीवाडी चाळीत एक धक्कादायक घटना घडली आहे.

घरात झाला टीव्हीचा स्फोट; थोडक्यात बचावले मायलेक
SHARES

मुंबईतील कांदिवली पूर्वेतील पोईसर भाजीवाडी चाळीत एक धक्कादायक घटना घडली आहे. या चाळीमधील एका घरात बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास एक स्फोट झाला. आश्चर्याची बाब म्हणजे हा स्फोट एका टीव्हीचा होता. एलसीडी टीव्ही चालू असताना अचानक तो फुटला.

या स्फोटामुळे चाळीत राहणाऱ्या सर्व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेत त्यावेळी घरात असणारी एक महिला आणि तिचा मुलगा थोड्यात बचावले आहेत. टीव्हीचा स्फोट झाल्यानंतर घरामध्ये सर्वत्र आग लागली.

घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा टीव्ही सॅमसंग कंपनीचा होता. रात्री आठच्या सुमारास टीव्ही पाहत असतानाच अचानक त्याचा स्फोट झाला आणि घरात आग लागली. घरात लागलेल्या या आगीमध्ये कपडे, अंथरुण, पडद्यांसोबत काही वस्तूही जळून खाक झाल्या आहेत.

घटनेची माहिती समता नगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा आढावा घेतला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा