Advertisement

वसईच्या पाटलांकडून साईचरणी दोन इमारतींचे दान


वसईच्या पाटलांकडून साईचरणी दोन इमारतींचे दान
SHARES

राज्यातील गोरगरिब, आदिवासी, दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आय. ए. एस. अॅकॅडमी सुरू करण्‍यासाठी शिर्डीच्या साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थेस दोन इमारती देणगीच्या स्वरुपात देण्यात आल्या आहेत. वसई तालुक्यातील कोपरी येथे राहणारे काशिनाथ पाटील यांनी त्‍यांच्या मालकीच्‍या सुमारे 32 कोटी रुपये किंमतीच्‍या बांधीव क्षेत्र असलेल्‍या दोन इमारती संस्‍थानला देणगीच्या स्वरुपात दिल्याची माहिती साईबाबा मंदिर संस्‍थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.

साईबाबा संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली 22 डिसेंबर 2016 रोजी झालेल्‍या सभेत काशिनाथ पाटील यांनी राहाता तालुक्यातील निघोज येथील गट क्र.177, 178, 282/1, 284 आणि 288/6 मधील भूखंड क्रं.1 मधील इमारत बी आणि डी या इमारती शिर्डी साई संस्थानला विनामोबदला हस्तांतरित केल्याचे अग्रवाल म्‍हणाल्‍या.

राज्‍यातील गोर-गरीब, आदिवासी, वंचित, दुर्बल विद्यार्थ्‍यांसाठी राज्‍य लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेची तयारी करून त्‍यांना प्रशासकीय सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी निवृत्‍त राजपत्रित अधिकाऱ्यांची मदत घेण्यात येईल.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा