Advertisement

ताडदेव इमारत आगीत दोघांचा मृत्यू, १५ जण जखमी

ताडदेव परिसरात असलेल्या कमला या इमारतीला ही आग (Kamala Building fire) लागली आहे.

ताडदेव इमारत आगीत दोघांचा मृत्यू, १५ जण जखमी
SHARES

मुंबईतील ताडदेव परिसरात इमारतीला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ताडदेव परिसरात असलेल्या कमला या इमारतीला ही आग (Kamala Building fire) लागली आहे. 

एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून १५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्दैवी घटना आहे, अशी माहिती महाराष्ट्र भाजप अध्यक्ष आणि आमदार, मंगल प्रभात लोढा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.

पण यानंतर आणखी एकाचा म़त्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे मृतांचा आकडा २ वर गेला आहे. 

आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांनी माहिती दिली की, सहा वृद्धांना ऑक्सिजन सपोर्ट सिस्टिमची गरज असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. पण धुराचे लोट परिसरात पसरले आहेत. सर्व लोकांची सुटका करण्यात आली आहे.

ही रहिवाशी इमारत असून २० मजली इमारत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. इमारतीच्या १८व्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीत २ जण जखमी झाले आहेत.  त्यांना उपचारासाठी शेजारील भाटीया रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

ताडदेव परिसरात असलेल्या भाटीया रुग्णालयाच्या जवळील कमला या बहुमजली इमारतीला ही आग लागली आहे. सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा