Advertisement

भांडूप उड्डाणपूलावरील अपघातात २ ठार


भांडूप उड्डाणपूलावरील अपघातात २ ठार
SHARES

भांडूप उड्डाणपूलावर शनिवारी सकाळी होंडा सिटी कार अाणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोघांना प्राण गमवावे लागले असून तीन जण गंभीर जखमी झाले अाहेत. होंडा सिटी कार ठाण्याच्या दिशेने जात असताना ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील उड्डाणपूलावर हा अपघात झाला.



कसा झाला अपघात

शनिवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास होंडा सिटी कार भांडूपच्या उड्डाणपुलावरून ठाण्याकडे जात असताना हा दुर्घटना घडली. वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी दुभाजकावर चढली. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरला या गाडीची जोरात धडक बसली. यामुळे कारचा समोरचा भाग पूर्णपणे चक्काचुर झाला.


दोघांचा मृत्यू, तीन जखमी

कारमध्ये २० ते २२ वयोगटातील पाच तरुण होते. यापैकी महेश (वय २१) आणि चिकू (वय २२) या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर हेमंत शिवगुडे (२१), निहार कोडे आणि अक्षय मोरे (२२) हे तिघेही जखमी झाले असून त्यांना मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या तिघांपैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात अालं अाहे. 


हेही वाचा-

मुंबईत महिन्याभरातच पडला ७५० मि. मी पाऊस

बोरीवलीत मधमाशांनी घेतला एकाचा जीव



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा