Advertisement

मुंबईत महिन्याभरातच पडला ७५० मि. मी पाऊस

मुंबईत , २९ जूनपर्यंत ७५० मि. मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ ४०० मि.मी एवढा पाऊस पडला होता. मागील वर्षाच्या तुलनेत ३५० मि.मी एवढा पाऊस अधिक पडल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त आय.ए. कुंदन यांनी दिली.

मुंबईत महिन्याभरातच पडला ७५० मि. मी पाऊस
SHARES

मुंबईत दरवर्षी सरासरी २५०० मि. मी एवढ्या पावसाची नोंद होते. मात्र, २९ जूनपर्यंत ७५० मि. मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ ४०० मि.मी एवढा पाऊस पडला होता. मागील वर्षाच्या तुलनेत ३५० मि.मी एवढा पाऊस अधिक पडल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त आय.ए. कुंदन यांनी दिली.


अधिकारी २४ तास कामावर

महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केलेल्या निवेदनावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना कुंदन यांनी ही माहिती दिली. मुंबईत प्रशासन काहीच करत नसून आम्ही केवळ बसून असतो हे आरोप आम्हाला मान्य नाही.

आमचे अधिकारी २४ तास अडचणींवर मात करत काम करतात. कोणत्याही राज्यातील शहरापेक्षा मुंबई शहर आपत्कालीन परिस्थितीबाबत गंभीर आहे. प्रशासन जबाबदारीनेच काम करत असल्याचेही कुंदन यांनी म्हटलं.


२२४ ठिकाणी पाणी तुंबतं

मुंबईत एकूण २२४ पाणी तुंबणारी ठिकाणे होती. ही संख्या कमी करून १२५ वर आणली आहे. ठिकठिकाणच्या पर्जन्य जलवाहिन्या रुंद केल्या आहेत. रेल्वे आणि एमएमआरडीएबरोबर समन्वय राखून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु मुंबईत एकूण सरासरी पडणाऱ्या २५०० मि.मी पावसाच्या तुलनेत २९ जूनपर्यंतच ७५० मि.मी एवढा पाऊस पडला आहे.

मागील २९ जून २०१७पर्यंतच्या कालावधीमध्ये पावसाची नोंद ४२० मि.मी एवढी झाली होती. त्यामुळे निश्चितच जास्त पाऊस झाल्यामुळे काही भागांमध्ये पाणी साचलं.

कुठेही पाणी साचलंच नव्हतं अशाप्रकारचा दावा आम्ही कधीच केला नव्हता, असंही त्यांनी म्हटलं. तसंच साथीच्या आजारांसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत उपाययोजना राबवल्या जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.



हेही वाचा-

मुंबईत पावसाचा आनंद घ्यायचाय? मग या १० ठिकाणी या!

मुंबईत पाणी तुंबलं, महापौरांनी नाही पाहिलं



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा