• मुंबईत पावसाचा आनंद घ्यायचाय? मग या १० ठिकाणी या!

SHARE

शनिवारपासून झालेल्या पावसाने मुंबई अक्षरक्ष: न्हाऊन निघाली आहे. पुढचे चार दिवस पावसाची ही रिपरिप सुरुच राहणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. मग अशावेळी पावसाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर मुंबईतील या १० ठिकाणांना आवर्जून भेट द्या.

मरीन ड्राइव्ह

मुंबईच्या सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी एक असलेलं मरीन ड्राइव्ह!. मरीन ड्राइव्हला राणीच्या हाराची उपमा देण्यात आली आहे. पावसाळ्यात येथील राणीच्या हाराचं साैंदर्य पाहण्यासारखं असतं. गरमागरम स्वीट कॉर्न खात येथे फिरण्याची मजा काही औरच. मात्र पावसाळ्यात मोठमोठ्या लाटा सतत येत असतात तेव्हा येथून फिरताना काळजी जरूर घ्या.

गिरगांव चौपाटी
मुंबईतील स्वच्छ आणि सुंदर चाैपाट्यांपैकी एक असलेलं गिरगाव चौपाटी. मोठमोठ्या गणपती विसर्जनासाठीची ही खास जागा. पावसात भिजत पाणी पुरी, शेव पुरी, चाट, भुट्टा याचाही आंनद तुम्ही येथे घेऊ शकता. मात्र ही माैजमजा करत असताना समुद्रापासून थोडं दूरच राहिलेलं बरं. कारण पावसाळ्यात येथेही मोठमोठ्या लाटा सतत येत असतात.

हँगिंग गार्डनमलबार हिल स्थित हँगिंग गार्डन हे मुंबईच्या सौंदर्यात अधिकच भर घालतं. याच्याच शेजारी असलेल्या कमला नेहरू उद्यानालाही जरूर भेट द्या. कारण गिरगाव चौपाटीचं मनोहारी दृश्य येथून बघायला मिळतं.

गेटवे ऑफ इंडियाभारतासहित विदेशी पर्यटकांनाही आकर्षित करणारं ठिकाण म्हणजे गेट वे ऑफ इंडिया. एका बाजूला गेटवे ऑफ इंडिया आणि दुसऱ्या बाजूला ताज हॉटेल. सेल्फी काढण्यासाठी एकदम खास अशा या ठिकाणी पावसाळ्यात नक्कीच भेट द्या.

हाजी अलीअतिशय प्राचीन दर्ग्यांपैकी एक म्हणजे हाजी अली. सर्वधर्म समभावाचं हे एक ऊत्तम उदाहरण आहे. चारही बाजूने याला समुद्राने वेढलेलं आहे. येथून सिलिंकचा नजाराही पाहण्याजोगे असतो.

जुहू बीचमुंबईच्या सर्वात पॉप्युलर बीचपैकी एक असलेलं जुहू बीच. क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही हा किनारा बराच मोठा आहे. गर्दीने नेहमीच भरलेला अशा या समुद्रकिनारी तुम्ही वडापाव, भजे पाव, भेळपुरी याचाही आस्वाद घेऊ शकता.

बॅंड स्टॅन्डकिंग खानच्या मन्नतला पाहण्यासोबत समुद्राला जवळून न्याहाळता येतं. पण लाटांचं प्रमाण पावसाळ्यात इथंही जरा जास्तच असतं म्हणून जरा जपूनच फिरलेलं बरं.

गोराई बीचप्राकृतिक सौंदर्याची उधळण या बीचवरून पाहायला मिळते. बोरिवलीजवळ असलेल्या या बीचवरून समुद्राचं अतिशय मोहक रूप पाहायला मिळतं.

तुंगारेश्वरवसईला असलेलं हे शंकराचं मंदिर तुंगारेश्वर म्हणून ओळखलं जातं. याठिकाणी ट्रेकिंगचा आनंद घेता येईल. सोबत धबधब्याचंही दृष्य पहायला मिळतं. पावसळ्यात येथील निसर्गसृष्टी पाहण्यासारखी असते.

नॅशनल पार्कबोरिवलीला असलेलं नॅशनल पार्क पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. येथील नैसर्गिक साैंदर्य, तलाव तुम्हाला जंगलात फेरफटका मारल्याचा आनंद देईल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या