Advertisement

'या' टर्मिनसच्या परिसरात २ लाख झाडं

पावसाळ्यात २ लाख झाडं लावण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे.

'या' टर्मिनसच्या परिसरात २ लाख झाडं
SHARES

मुंबईतील मध्य रेल्वेच्या (Central Railway) महत्त्वाच्या 'लोकमान्य टिळक टर्मिनस'च्या (LTT) परिसरात झाडं लावण्यात येणार आहेत. येत्या पावसाळ्यात एलटीटी परिसरात २ लाख झाडं लावण्याचा निर्णय रेल्वेनं (Railway) घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडं पाठवण्यात आल्याची माहिती मिळते. तसंच, मियावाकी या जपानमधील (Japan) आधुनिक पद्धतीनुसार झटपट वाढणारी झाडं या परिसरात लावण्यात येणार आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस इथं मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आहे. त्यामुळं प्रवासी (Passengers) येथून प्रवास करणं टाळतात. परंतु, गेल्या काही वर्षांत टर्मिनसवर मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत. स्वच्छते बाबतही दक्षता पाळली जाते. ५० ते ६० एकर जागेत उभारलेल्या या टर्मिनसच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पडीक जागा आहे.

या जागेत विविध प्रकारची झाडं लावल्यास, टर्मिनस अधिक सुंदर दिसेल शिवाय प्रदूषणालादेखील आळा घालता येईल, या उद्देशाने लोकमान्य टिळक टर्मिनसचे मुख्याधिकारी एस. एम. सोनावणे यांनी या जागेवर झाडे लावण्याची संकल्पना रेल्वेसमोर मांडली. रेल्वेकडून हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर येत्या जुलै महिन्यापासून या कामाला सुरुवात होणार आहे.

कडुनिंब, अशोका, पिंपळ, सोनबवा आणि करंज यांसह काही शोभेची झाडे या ठिकाणी लावली जाणार आहेत. तसंच, टर्मिनसच्या बाजूला असलेल्या नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी झाडांना देण्यात येणार आहे. पावसाळ्यात फलाटांवर लावण्यात आलेल्या पत्र्यांवरील पाणी जमा करून या पाण्याचा वापर उन्हाळ्यात या झाडांसाठी करण्यात येणार असल्याची माहिती मिळते.



हेही वाचा -

येत्या काळात मुंबईसह राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार

मुंबईत रेल्वे एक्स्प्रेसनं दाखल होणाऱ्या प्रवाशांची तपासणी नाही



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा