Advertisement

मुंबईत रेल्वे एक्स्प्रेसनं दाखल होणाऱ्या प्रवाशांची तपासणी नाही

मुंबई दाखल होणाऱ्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांची कोणतीही तपासणी केली जात नाही. एक्स्प्रेसद्वारे कोरोनाचा शिरकाव मुंबईतही होण्याची भीती आहे.

मुंबईत रेल्वे एक्स्प्रेसनं दाखल होणाऱ्या प्रवाशांची तपासणी नाही
SHARES

सध्या जगभरात करोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. मुंबई विमानतळाच्या परिसरात परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. मुंबई मेट्रो - १ मार्गातील परिसर स्वच्छ ठेवण्यात येत आहे. अनेक जण खबरदारीनं राहत आहे. मात्र, मुंबई दाखल होणाऱ्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांची कोणतीही तपासणी केली जात नाही. एक्स्प्रेसद्वारे कोरोनाचा शिरकाव मुंबईतही होण्याची भीती आहे. रेल्वेकडून कोरोनाविषयी जनजागृती केली जात असली, तरी तपासणी होत नसल्याचे दिसून येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरीवली इथं लांब पल्ल्यांच्या गाड्या थांबतात. परंतु, इथं कोणत्याही प्रकारची तपासणी होत नसल्याचे चित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर थर्मल स्क्रीनिंगद्वारे प्रत्येक प्रवाशांची तपासणी केली जात आहे. यातून कोरोनाचा प्रसार होऊ नये, हा उद्देश आहे. मात्र, आता देशभरात कोरोनाचे संशयित रुग्ण वाढत आहेत.

मंगळवारी पुण्यात ५ आणि केरळमध्ये ३ संशयित रुग्ण आढळून आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळं देशांतर्गत एक्स्प्रेसद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी होणं आवश्यक असल्याची मागणी प्रवाशांकडून केली आहे. स्थानकावर थर्मल स्क्रीनिंगद्वारे प्रत्येक प्रवाशाची तपासणी करणे कठीण आहे. मात्र, प्रवाशांकडून कोरोना संशयित रुग्ण प्रवासात असल्याची तक्रार आल्यास, तत्काळ उपाययोजना करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

स्थानकावर रेल्वे कर्मचारी वर्गाला जागरूक केले आहे. रेल्वे रुग्णालयातील कर्मचारी दक्ष आहेत. कोरोना संशयित रुग्ण आढळून आल्यास, तत्काळ जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्याच्या सूचना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत, अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

कोरोना संशयित रुग्ण आढळल्यास, मुंबई सेंट्रल येथील जनजीवन राम रुग्णालयात ३० बेडची व्यवस्था केली आहे. पश्चिम रेल्वेद्वारे जनजीवन राम रुग्णालयात कंट्रोल रूम स्थापित केला आहे. त्यामुळे मेडिकल अधिकाऱ्यांचा ९००४४९०५६० व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सुरू केला आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मास्क देण्यात आले आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर उद्घोषणेद्वारे जनजागृती केली जात आहे. रेल्वे कॉलनी, कार्यालय, स्थानकावर स्वच्छता करण्यात येत आहे.



हेही वाचा -

येत्या काळात मुंबईसह राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार

टिळक पुलाची दुरवस्था, पर्यायी मार्ग अद्याप नाही



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा