Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,26,710
Recovered:
46,00,196
Deaths:
78,007
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,859
2,116
Maharashtra
5,46,129
46,781

टिळक पुलाची दुरवस्था, पर्यायी मार्ग अद्याप नाही

टिळक पुलाची आता दुरवस्था झाली असून, या पुलाच्या दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आली आहेत.

टिळक पुलाची दुरवस्था, पर्यायी मार्ग अद्याप नाही
SHARES

दादर पूर्व (Dadar E.) आणि पश्चिम (West) जोडणाऱ्या टिळक पुलावर (Tilak) दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. प्रभादेवी स्थानकावरील एल्फिन्स्टन पूल आणि टिळक पूल या दोन पुलांवर वाहतुकीची भिस्त आहे. मात्र टिळक पूल हा अतिशय जुना असल्यामुळं कधीही दुर्घटना होऊ शकते. तसंच, या टिळक पुलाची आता दुरवस्था झाली असून, या पुलाच्या दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आली आहेत. भविष्यात या पुलाला पर्यायी पूल बांधण्याचं पालिकेचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी ३ ठिकाणांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी २ पर्याय तांत्रिक समितीनं नाकारले आहेत. त्यामुळं आता तिसऱ्या पर्यायासाठी पालिका (BmC) चाचपणी करणार आहे. मात्र, त्यासाठी महापालिकेला रेल्वेच्या परवानगीची प्रतीक्षा आहे.

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात या पुलाचा प्लास्टरचा काही भाग हिंदू कॉलनीच्या (Hindu Colony) दिशेनं जाणाऱ्या मार्गावर कोसळला होता. तेव्हा या पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये हा पूल ३ ठिकाणी खचला. त्यामुळं या पुलाला पर्याय शोधण्याची गरज अधिक आहे.

टिळक पुलाचं केवळ दृक्परीक्षण न करता सखोल संरचनात्मक परीक्षण करण्यात आले. त्यात टिळक पुलाबाबत मोठ्या संरचनात्मक दुरुस्ती सुचवण्यात आल्या आहेत. जीर्ण झालेल्या मुख्य लोखंडी भागांची संरचनात्मक दुरुस्ती करणे, सिमेंटने दगडी बांधकामांच्या भेगा भरणे, जीर्ण झालेल्या पदपथांच्या काही भागांची पुनर्बाधणी करणे व प्लास्टर करणे ही कामे हाती घेण्यात आली असून ती मे २०२० पर्यंत पूर्ण होणार असल्याचे पूल विभागाचे म्हणणे आहे.

त्यातच रेल्वेनं आयआयटीकडून (IIT) जी तपासणी केली त्यात या पुलाचा पृष्ठभाग खरवडण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या संमतीनंतर हे कामही हाती घेण्यात येणार आहे. याबरोबरच टिळक पुलाच्या पर्यायी व्यवस्थेसाठी तीन ठिकाणी दादर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारे आणि रेल्वे मार्गावरून जाणारे पूल प्रस्तावित करण्यात आले होते. टिळक पुलावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पालिकेने शोधलेल्या तीन पर्यायी मार्गापैकी माटुंगा जिमखान्याकडून जाणाऱ्या प्रस्तावित पुलाचा अधिकाधिक भाग हा पश्चिम व मध्य रेल्वेच्या हद्दीतून जातो. त्यामुळे हा पर्यायी मार्ग कितपत व्यवहार्य आहे हे तपासण्यासाठी पालिकेने रेल्वे प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाल्यानंतरच या पुलाचे भवितव्य ठरणार आहे.

हे पर्याय

  • टिळक पुलाच्या दक्षिणेकडे एमएमजीएस मार्ग ते एम. सी. जावळे मार्ग यांना जोडणारा पूल
  • टिळक पुलाच्या उत्तरेकडील दिशेला बाल गोविंददास मार्ग ते लखमशी नप्पु मार्ग (माटुंगा जिमखाना) यांना जोडणारा पूल
  • माटुंगा आणि शीव स्थानकांदरम्यान टी. एच. कटारिया मार्ग ते भाऊ दाजी मार्ग यांना जोडणारा सेंट्रल रेल्वे मार्गावरील पूल.हेही वाचा -

येत्या काळात मुंबईसह राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार

मुंबईकरांना लवकरच होणार उन्हाळ्याची जाणीवसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा