Advertisement

बाळ वॉर्डबाहेर नेताना रोखलं नाही; नायर रुग्णालयातील महिला सुरक्षा रक्षक निलंबीत

मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील प्रसूती विभागात सोमवारी बाळाला वॉर्डबाहेर नेण्यात आलं. परंतु याची कोणतीही कल्पना विभागातील नर्स आणि डॉक्टर यांना नव्हती. त्यामुळे बाळाचा शोध सुरू झाला. मात्र, त्यानंतर नातेवाईकच बाळाला घेऊन पुन्हा वॉर्डमध्ये दाखल झाले.

बाळ वॉर्डबाहेर नेताना रोखलं नाही; नायर रुग्णालयातील महिला सुरक्षा रक्षक निलंबीत
SHARES

महापालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयातील बाळ चोरी प्रकरणावरून महापालिकेच्या रुग्णालयातील सुरक्षेवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं असतानाच पुन्हा एकदा नायर रुग्णालयात बाळाला वॉर्डबाहेर नेल्याची घटना निदर्शनास आली आहे. मात्र, या बाळाला वॉर्डबाहेर नेताना डॉक्टरही सोबत नव्हते. तर त्या बाळाच्या नातेवाईकांना दरवाज्यावर रोखण्याचं काम सुरक्षा रक्षकांनी केलं नाही. या निष्काळजीपणाबद्दल दोन महिला सुरक्षा रक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात आलं अाहे.


गप्पा पडल्या महागात 

मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील प्रसूती विभागात सोमवारी बाळाला वॉर्डबाहेर नेण्यात आलं. परंतु याची कोणतीही कल्पना विभागातील नर्स आणि डॉक्टर यांना नव्हती. त्यामुळे बाळाचा शोध सुरू झाला. मात्र, त्यानंतर नातेवाईकच बाळाला घेऊन पुन्हा वॉर्डमध्ये दाखल झाले. त्यामुळे बाळाला वॉर्डबाहेर नेलंच कसं? यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखलं का नाही? असा प्रश्न उपस्थित  झाला. त्यानंतर येथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं असता, येथील तैनात महिला सुरक्षा रक्षक या गप्पा करत आल्याचं दिसून आलं. त्यामुऴे या दोन्ही महिला सुरक्षा रक्षकांना त्वरित सेवेतून निलंबित करण्यात आलं.


खात्यांतर्गत चौकशी 

प्रसूती विभागातून कोणतंही बाळ बाहेर नेताना त्याची सुरक्षा रक्षकांकडून नोंद ठेवली जाते. परंतु या विभागातून बाळाला बाहेर घेऊन जात असताना सुरक्षा रक्षकांनी त्यांना हटकले नाही की त्यांची नोंद घेतली नाही. त्यामुळे कर्तव्य कसूर केल्याप्रकरणी दोन महिला सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आलं असल्याचं उपायुक्त डॉ. किशोर क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं. त्या दोघींचीही खात्यांतर्गत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.


डॉक्टरांची परस्पर सूचना 

महापालिकेच्या नियमानुसार बाळाला अन्य विभागात घेऊन जायचं असेल तर त्यासोबत डॉक्टर असणं आवश्यक आहे. परंतु डॉक्टर स्वतः त्या बाळाच्या नातेवाईकसोबत गेले नाहीत की नर्स किंवा सुरक्षा रक्षकांनाही पाठवलं नाही. त्यामुळे डॉक्टरांनी परस्पर सूचना दिल्यामुळेच या बाळाला येथील दंत रुग्णालयात घेऊन गेले होते, असं बोललं जातं आहे.


का नेलं दंत रुग्णालयात

या बाळाला जन्मताच दात आले होते. जन्मताच बाळाला दात येणं ही आश्चर्यकारक घटना आहे. त्यामुळे या बाळाला नायर दंत रुग्णालयात दाखवून आणण्याची सूचना केली होती. त्यानुसार नातेवाईक त्या बाळाला तिथं घेऊन गेल्याचं बोललं जातं.



हेही वाचा - 

घर तर नाहीच पण व्याजही मिळेना; निर्मल लाईफस्टाईलविरोधात महारेराकडं तक्रार

गिरणी कामगारांना पाहिजेत संक्रमण शिबिराची घरे!




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा