Advertisement

घराबाहेर पडा, मतदान करा - आयुक्त


घराबाहेर पडा, मतदान करा - आयुक्त
SHARES

चर्चगेट - आगामी मुंबई महापालिका निवडणूक काही दिवसांवर आली आहे, त्यामुळे निवडणुकी दिवशी घराबाहेर पडा आणि मतदान करा, असं आवाहन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी विशेषतः युवकांना केलं. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अर्थात राष्ट्रीय युवा दिन निमित्तानं रामकृष्ण मिशन यांच्या वतीने गुरुवारी भारताचे प्रवेशद्वार अर्थात गेट वे ऑफ इंडिया येथे जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. गेट वे ऑफ इंडिया स्थित स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला याप्रसंगी पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसंच रामकृष्ण मिशन (बेलूर मठ) चे सहाय्यक सचिव स्वामी भजनानंदजी महाराज लिखित यूथ पॉवर अँड द पॉवर ऑफ आयडियाज या पुस्तकाचं प्रकाशन देखील अजोय मेहता यांच्या हस्ते करण्यात आलं. या वेळी शिक्षण विभागाचे उपायुक्त मिलिंद सावंत, ए वॉर्ड पालिका विभागाचे सहायक आयुक्त किरण दीघावकर उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा