Advertisement

क्लीनअप मार्शलसाठी गणवेश सक्तीचा; मार्शलच्या गैरवर्तणुकीला बसणार चाप

मुंबईत ठिकठिकाणी निर्माण होणारी दुर्गंधी व यामुळं निर्माण होणारे आजार टाळण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवत आहेत.

क्लीनअप मार्शलसाठी गणवेश सक्तीचा; मार्शलच्या गैरवर्तणुकीला बसणार चाप
SHARES

मुंबईत ठिकठिकाणी निर्माण होणारी दुर्गंधी व यामुळं निर्माण होणारे आजार टाळण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवत आहेत. तसंच, ही दुर्गंधी कायमस्वरुपी नष्ट करण्यासाठी महापालिकेनं क्लीनअप मार्शलची नेमणुक केली आहे. मात्र, हे क्लीनअप मार्शल नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. याच कारण म्हणजे ड्युटीवर असताना साध्या (सिव्हिल) कपड्यांमध्ये कारवाई करणं, दंड वसुली न करता 'चिरीमिरी' घेणं, नागरिकांना धमकावणं या क्लीनअप मार्शलकडून मुंबईकरांसोबत होणाऱ्या गैरवर्तणुकीला चाप लावण्यासाठी महापालिकेनं पावले उचलली आहेत. 

क्लीनअप मार्शलना ड्युटीवर असताना गणवेश सक्तीचा असून कोटच्या दोन्ही बाजूला महापालिकेचा विभाग, मार्शल व कंत्राटदार एजन्सीचे नाव, क्रमांक लिहिणं सक्तीचे करण्यात आले आहे. तसे कोट एजन्सीकडून बनवून घेण्यात आले असून लवकरच या नियमावलीची अमलबजावणी होणार आहे.

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या अस्वच्छतेवर कारवाई करण्यासाठी महापालिकेनं घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार क्लीनअप मार्शल नेमले आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, नैसर्गिक विधी, अस्वच्छता, मास्क न लावणं यासह विविध बाबींवर कारवाई करण्याचे अधिकार मार्शलना देण्यात आले आहेत. कोरोनाकाळात मास्क बंधनकारक असून, नागरिकांवर वचक ठेवण्यासाठी मार्शलच्या कारवाईला गती देण्यात आली आहे. कारवाई सुरू झाल्यानंतर गेल्या २ वर्षांत काही भागात क्लीनअप मार्शलनी गैरवर्तणूक केल्याच्या तक्रारी नागरिकांनी पालिकेकडे केल्या आहेत.

या तक्रारींची गंभीर दखल घेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घनकचरा खात्याचे संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि क्लीनअप मार्शल एजन्सी यांची एक बैठक मागील महिन्यात घेतली होती. मार्शलच्या गैरवर्तणुकींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मार्शल सेवेत असताना गणवेश सक्तीचा असावा, गणवेशावरील कोटच्या पुढे आणि मागे संबंधित मार्शलची ओळख दर्शविणारा क्रमांक यासह विविध माहिती असावी, अशा सूचना महापौरांनी मार्शलच्या एजन्सीना दिल्या होत्या. मुंबईत हजारो मार्शल असल्यानं नवे कोट तयार करण्यासाठी एजन्सींनी पालिकेकडून मुदत मागून घेतली होती. या नव्या कोटवर आता महापौरांनी शिक्कामोर्तब केले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा