Advertisement

वांद्र्यात समुद्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू

मुंबईतील वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड या भागातील समुद्रात बुडून एका २९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

वांद्र्यात समुद्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू
SHARES

मुंबईतील वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड या भागातील समुद्रात बुडून एका २९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिथुनकुमार ब्रम्हप्रसाद कारियार (२९) असं या मृत तरूणाचं नाव आहे. मिथुनकुमार हा समुद्रात बुडत असल्याचं समजताच तेथील स्थानिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत त्याला बाहेर काढलं. तसंच, उपचारासाठी तातडीनं भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

समुद्रकिनारी जाऊ नये

'वायू' चक्रीवादळामुळं मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर जोरदार वारे वाहत असून, लाटा उसळ होत्या. त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीनं समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन पोलिस आणि पालिका प्रशासनाच्या वतीनं मुंबईकरांना करण्यात आलं होतं. मात्र, तरीही वांद्रे बॅण्डस्टॅण्ड इथं अनेकांनी गर्दी केली होती. मिथुन हा बॅण्डस्टॅण्ड परिसरातील 'कॅफे कॉफी डे'च्या बाजूनं समुद्रात उतरला होता. त्यावेळी समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडत होता.

२ जण बुडाली

बांद्रा येथील बँडस्टँडलगत असलेल्या समुद्रात याआधीही बुडून काही तरूणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याशिवाय काही दिवसांपूर्वीच जुहू आणि गिरगाव चौपाटीवर २ जण बुडाल्याची घटना घडली होती.



हेही वाचा -

कोलकात्यात डॉक्टरांना मारहाण, मुंबईसह राज्यभरात निवासी आणि शिकाऊ डॉक्टरांचं आंदोलन



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा