Advertisement

भाज्यांसोबत डाळींचे भाव देखील वाढले, सर्वसामान्यांचं आर्थिक गणित बिघडलं

भाजीपाल्याचे दर झपाट्यानं वाढले आहेत. यासोबतच डाळींच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

भाज्यांसोबत डाळींचे भाव देखील वाढले, सर्वसामान्यांचं आर्थिक गणित बिघडलं
SHARES

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे भाजीपाला, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याचाच परिणाम आता दिसून येत आहे. भाजीपाल्याचे दर झपाट्यानं वाढले आहेत. यासोबतच डाळींच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

मुंबईतही भाजीपाल्याचे दर सातत्यानं वाढत आहेत. दहा रुपयांना विकली जाणारी भेंडी ४० रुपयांना विकली जात आहे. टोमॅटो ४० ते ६० रुपयांना विकला जात आहे. कोबी २० ते ४० रुपये, वांगे १५ ते ४०, बटाटा ३० ते ४० रुपये, फ्लॉवर ६० ते १२० मध्ये विकला जात आहे.

आकाशाला भिडलेल्या भाज्यांच्या किंमतीमुळे लोकांच्या खिशाला कात्री लागली आहे. लॉकडाऊनमध्ये आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्यांसाठी तर हा भुर्दंडच आहे. भाजीपाल्याचे दर आता लोकांच्या बजेटच्या पलिकडे गेले आहेत. देशातील डाळींचा वार्षिक वापर सुमारे २४० लाख टन आहे. तर मागील दोन पीक वर्षात देशांतर्गत उत्पादन कमी होते.

गेल्या महिन्यापासून देशातील प्रमुख डाळींच्या बाजारात उडीदच्या दरात क्विंटल ५०० रुपयांची वाढ झाली आहे. तर तूरच्या भावात क्विंटलमध्ये सुमारे ६०० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर मुगाच्या किंमतीत प्रति क्विंटल ८०० रुपयांनी वाढ झाली आहे.



हेही वाचा

परळ, शिवडी, नायगांव परिसरातील पाणीपुरवठा शुक्रवारी बंद

मुंबईच्या तापमानात घट नाही, पावसाचीही विश्रांती

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा