Advertisement

एपीएमसी मार्केटमध्ये आवक वाढली; भाजीपाल्याच्या दरात घसरण

सध्यस्थितीत भाजीपाला मार्केटमध्ये गाड्यांची आवक वाढल्यानं भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये आवक वाढली; भाजीपाल्याच्या दरात घसरण
SHARES

भाजीपाल्याच्या (vegetable) दारात मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परंतु, सध्यस्थितीत भाजीपाला मार्केटमध्ये गाड्यांची आवक वाढल्यानं भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली आहे. गुरुवारी भाजीपाला मार्केटमध्ये (vegetables market) एकूण ६५० गाड्यांची आवक झाल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यभरात पडलेल्या परतीच्या पावसामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. गेल्या काही दिवसांपासून मुंबई एपीएमसी (navi mumbai apmc market) घाऊक बाजारात भाज्यांच्या किंमतीत चढ-उतार बघायला मिळत होते, मात्र आता बाजारात भाज्यांच्या दरात घसरण होत आहे. नवी मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये जवळपास ६५० गाड्यांची आवक झाली असून भाजीपाल्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली. सध्या बाजारात भेंडी २० ते ३० रुपये, कोबी ३० ते ४० रुपये, मिरची ३० ते ४० रुपये, विकली जात असून टोमॅटो २५ ते ३५, वांगी ३० ते ४० तर कोथिंबीर १० ते २० रुपये दराने विकली जात आहे.

मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये लॉकडाऊनमुळे ३०० ते ४०० वाहनांची आवक होत होती. पणजवळपास ८ महिन्यांनंतर एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये ६२७ गाड्यांची आवक झाली. त्यामुळे भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा