Advertisement

Mumbai Live Updates: पावसामुळं भाजीपाल्याचं नुकसान; किरकोळ बाजारात किमती वाढल्या

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात पडत असलेल्या पावसामुळं भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं आहे.

Mumbai Live Updates: पावसामुळं भाजीपाल्याचं नुकसान; किरकोळ बाजारात किमती वाढल्या
SHARES

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात पडत असलेल्या पावसामुळं भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं मुंबई-ठाण्यातील बाजारांमध्ये भाज्यांची होणारी आवक कमी झाली आहे. याचा थेट परिणाम दररोजच्या बाजारातील भाज्याच्या किंमतीवर झाल्याची माहिती समोर येत आहे. किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर किलोमागे २० ते ३०० रुपयांनी वाढले आहेत. वाटाण्याचे दर घाऊक बाजारातच १२० रुपये किलोवर गेले असून किरकोळ बाजारात १५० रुपये किलो दरानं वाटाणा विकला जातो आहे.

गेल्या आठवड्यात ४० ते ५० रुपये प्रतिकिलोनं मिळणाऱ्या फळभाज्या ६० ते ८० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. येत्या काळात अधिक भाववाढ होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणं आहे.तर घाऊक बाजारात मेथी, शेपू, माठ या पालेभाज्यांचे दर २५ ते ३५ रुपये जुडीपर्यंत येऊन पोहोचले आहेत. तर कोथिंबीर २० ते २५ रुपये प्रतिजुडी आहे.

वाटाण्याचे भाव शंभरीपार असून कोबी आणि फ्लॉवरचे दरही ८० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. दुधी, काकडी, गाजर, तोंडली, भेंडी या फळभाज्या ६० ते ८० रुपये प्रतिकिलोनं विकल्या जात आहेत. भाज्याच्या दरात दुप्पटीनं वाढ झाल्यामुळं सामान्यांना पुन्हा एकदा महागाईच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.



हेही वाचा -

महापालिकेच्या शाळांमध्येही डिजिटल वर्ग सुरू होणार

२६/११ हिरो तुकाराम ओंबळे यांचा अनोखा सन्मान, नव्या कोळी प्रजातीला दिले नाव

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा