Advertisement

पावसाळा संपताच भाज्यांचे दर कडाडले

वेगवेगळ्या ठिकाणी फळभाज्या पुन्हा किलोमागे शंभरीच्या आसपास आहेत.

पावसाळा संपताच भाज्यांचे दर कडाडले
SHARES

पावसाळा संपण्याच्या बेतात असताना किरकोळ बाजारात पुन्हा  भाज्यांची भाववाढ झाली आहे. मुंबईतील बाजारपेठांमध्ये भाज्यांच्या वाढते दर पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी फळभाज्या पुन्हा किलोमागे शंभरीच्या आसपास आहेत. सिमला मिरची, भेंडी, गवार, फरसबी, पडवळ आदी भाज्या किलोमागे १०० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत.

मागील महिन्यात ४० रुपये पाव किलो असलेल्या फरसबीचा भाव आता २५-३० रुपयांपर्यंत उतरला आहे. गेले काही दिवस गायब असलेली तोंडली आता पुन्हा दिसू लागली आहे. पण त्यांनीही शंभरी पार केली आहे. ग्रेव्हीसाठी लागणारा टॉमेटो २-३ आठवड्यांपूर्वी दर्जानुसार ३० ते ४० रुपये किलो होता. मात्र आता त्याचा भाव ८० रुपयांच्या आसपास आहे.

कांदा देखील आता बटाट्याच्या बरोबरीने ४० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पालक-शेपू-लाल माठ यांच्या जुड्या २० रुपयांपर्यंत आहेत, पण पालकाच्या जुडीची जाडी कमी झाली आहे. कोथिंबीरीच्या जुडीचा आकार सर्वात जास्त रोडावला आहे. एरवी १० रुपयांना छोटी व २० रुपयांना मोठी अशी कोथिंबिरीची जुडी मिळते. पण आता १० रुपयांची छोटी जुडी पाहून विश्वासच बसत नाही. मोठ्या जुडीसाठी ५० रुपये मोजावे लागतात. मेथीची जुडीही २० रुपयांना आहे.



हेही वाचा -

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं ‘या’ विषयावर पत्र

पेडर रोड लवकरच वाहतुकीसाठी होणार खुला


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा