मुंबईसह राज्यभरात परतीच्या पावसाला अद्याप सुरूवात झालेली नाही. मात्र, या पावसाचा फटका आता भाज्यांवर बसत आहे. पावसामुळं भाजीपाल्याच्या दरांत वाढ झाली आहे. तसंच, आवक रोडवल्यामुळं घाऊक बाजारात सर्व भाज्या सरासरी ५० रुपये किलोच्या वर गेल्या आहेत.
प्रचंड पाऊस व पूरस्थितीमुळं अनेक ठिकाणी पावसाळ्यातील मुख्य पीक वाहून गेलं व खराब झालं आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी तेच पीक उशिरानं घेतलं. पण अनेक भागांत अद्यापही पाऊस असल्यानं त्याचा या पिकालाही फटका बसला आहे. मुंबई व परिसरासाठी या काळात दररोज साधारण ४ हजार टन भाज्यांची आवक होत असते. यंदा ती २,८००-३,००० टनांपर्यंत घसरली आहे.
पावसामुळं बराच माल खराब दर्जाचा आहे. एखादा किरकोळ विक्रेता १०० किलो भाजी घाऊक बाजारातून विकत घेत असल्यास त्याला ३० ते ४० किलो भाजी फेकावी लागत आहे. त्यामुळं त्याला ६० किलोत १०० किलोचा खर्च भरून काढावा लागत आहे.
भाजी | आधी | आता |
भेंडी | ८०-१०० | १००-१२० |
फुलकोबी | १२० | १२०-१४० |
घेवडा | ६०-८० | ८०-१०० |
फरसबी | ६०-८० | ९०-१०० |
गवार | ४०-६० | ६०-८० |
ढोबळी मिरची | ४०-५० | ६०-८० |
पडवळ | ४० | ६० |
टोमॅटो | ४०-५० | ६०-८० |
हिरवी मिरची | ४० | ६० |
तोंडली | ६० | ८०-१०० |
काकडी | ४० | ६० |
हेही वाचा -
अटक झालेल्या आरे आंदोलकांची कपडे उतरवून तपासणी
राहुल गांधी यांची १३ ऑक्टोबरला मुंबईत सभा