Advertisement

राहुल गांधी यांची १३ ऑक्टोबरला मुंबईत सभा


राहुल गांधी यांची १३ ऑक्टोबरला मुंबईत सभा
SHARES

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारासाठी कॉग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्र दौरा करणार आहेत. राहुल गांधी यांचा १३ व १५ ऑक्टोबर असा दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा निश्चित झाला आहेरविवारी१३ ऑक्टोबरला मुंबईत व लातूर जिल्ह्यातील औसा येथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत

धारावीत सभा

१३ ऑक्टोबरला राहुल गांधी यांची मुंबईतील सभा धारावी इथं होणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिली. सध्यस्थितीत राहुल यांच्या सभेची तयारी करण्यासाठी फारच वेळ कमी असल्यामुळं धारावीत सभा घेण्याचं ठरविण्यात आलं आहे. दरम्यान, भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी निवडणूकीच्या प्रचारात राहुल गांधी यांना लक्ष्य केलं आहे. त्यामुळं मुंबईतील सभेत विरोधकांच्या टीकेला ते उत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

१५ ऑक्टोबरला सभा

राहुल गांधी यांच्या १५ ऑक्टोबरलाही राज्यात सभा होणार आहेत. मात्र, त्या सभा किती व कुठे होणार याबाबत माहिती अद्याप अस्पष्ट आहे. राहुल यांच्याप्रमाणेच पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, प्रियांका गांधी यांच्याही सभा होणार आहेत. त्याची तयारी सुरु आहे. मात्र या सभांबाबतचा देखील तपशील अद्याप ठरलेला नसल्याचं समजतं.हेही वाचा -

शिवसेना युतीत सडली आणि १२४ वर अडली- राज ठाकरे

मला सत्ता नको, प्रबळ विरोधी पक्ष बनवा- राज ठाकरेसंबंधित विषय
Advertisement