Advertisement

मला सत्ता नको, प्रबळ विरोधी पक्ष बनवा- राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चक्क आपल्या पहिल्याच प्रचारसभेत मला प्रबळ विरोधी पक्ष बनवा, अशी मागणी मतदारांकडे केली. मुं

मला सत्ता नको, प्रबळ विरोधी पक्ष बनवा- राज ठाकरे
SHARES

महाराष्ट्राची सत्ता एकदा हाती द्या मी तुम्हाला महाराष्ट्र सुतासारखा सरळ करुन दाखवेन, अशी एकेकाळी मागणी करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चक्क आपल्या पहिल्याच प्रचारसभेत मला प्रबळ विरोधी पक्ष बनवा, अशी मागणी मतदारांकडे केली.  

मुंबईतल्या सांताक्रूझ येथील मराठा कॉलनीतील सभेपासून राज ठाकरे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला. याआधीची पुण्यातील सभा पावसामुळे वाया गेल्याने राज काय बोलणार यांच्याकडे मनसैनिकांचं लक्ष लागलं होतं. परंतु त्यांनी केवळ १० ते १५ मिनिटांत आपलं भाषण आटोपतं घेतलं.   

काय म्हणाले राज ठाकरे? 

शहरांचं नियोजन कोसळलंय, जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे लोकांचे जीव जात आहेत. अर्ध्या तासाच्या पावसात शहर बुडताहेत. निवडणुका आल्या की जाहीरनामे बाहेर येतात, वाट्टेल ती आश्वासन दिली जातात. पुन्हा परिस्थिती जैसे थे. आणि विरोधी पक्षाचे नेतेच सत्ताधारी पक्षात जाऊन बसतात आणि सत्ताधारी आमदार गप्प बसतात मग तुमचे प्रश्न मांडणार कोण? पीएमसी बँक बुडाली, लोकांचे हक्काचे पैसे त्यांना काढता येत नाहीत. बरं या बँकेवर अधिकारी पदावरची माणसं कोण तर भाजपची. शेतकरी, कामगार देशोधडीला लागलेत, तरुण बेरोजगार झालेत आणि सरकार कसंही वागतात, न्यायालयांकडून निर्णय मिळत नाहीत. मग जनतेचा राग कोण व्यक्त करणार? सत्तेतला आमदार काहीही करू शकत नाही. 

त्यामुळेच मी या विधानसभेला तुमच्याकडे एक मागणं घेऊन आलोय; ते मागणं म्हणजे, या राज्याला गरज आहे ती सक्षम विरोधी पक्षाची. सत्तेतला आमदार सरकारला प्रश्न विचारू शकत नाही पण विरोधी पक्षातला आमदार सरकारला नामोहरम करू शकतो. म्हणूनच इतिहासात कुणीच अशी मागणी केली नसेल, जी करतोय ती म्हणजे, तुमचे प्रश्न मांडण्यासाठी मला प्रबळ विरोधी पक्ष बनवा. आज गरज आहे सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांची आणि जर विधानसभेत प्रबळ विरोधी नसेल तर सरकार तुमच्यावर बुलडोझर फिरवेल आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, कारण माझे उमेदवारच सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतील, त्यांना उत्तरं द्यायला भाग पाडतील, मनसे सारखा जो पर्यंत प्रबळ विरोधी पक्ष नसेल तोपर्यंत हे सरकार तुमचं कोणतंही काम करणार नाही. माझा आवाका मला ठाऊक आहे त्यामुळे मला सक्षम विरोधी पक्ष बनवा. जेव्हा सत्ता मागायची वेळ येईल तेव्हा मी सत्ताही मागेन असंही ते म्हणाले.  



हेही वाचा-

रस्त्यावर सभा घेऊ द्या, मनसेचं निवडणूक आयुक्तांना पत्र

'त्याने' पक्ष बदलताच राज ठाकरेंच्या फोटोच्या जागी आले...



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा