Advertisement

'त्याने' पक्ष बदलताच राज ठाकरेंच्या फोटोच्या जागी आले...

विचारधारेसाठी तहहयात पक्षाची इमानएतबारे सेवा करणारे कार्यकर्ते काळाच्या ओघात केव्हाच लुप्त झाले. आता पक्ष बदलला ही निष्ठाही बदलते आणि अर्थातच प्रेरणास्त्रोत म्हणवणारे नेतेही बदलतात.

'त्याने' पक्ष बदलताच राज ठाकरेंच्या फोटोच्या जागी आले...
SHARES

विचारधारेसाठी तहहयात पक्षाची इमानएतबारे सेवा करणारे कार्यकर्ते काळाच्या ओघात केव्हाच लुप्त झाले. आता पक्ष बदलला ही निष्ठाही बदलते आणि अर्थातच प्रेरणास्त्रोत म्हणवणारे नेतेही बदलतात. याच उत्तम उदाहरण सध्या पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असताना काही दिवसांपूर्वी मनसेला मोठा धक्का बसला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर (Nitin Nandgaonkar) यांनी शिवसेनेत (Shiv sena) प्रवेश केला. विशेष म्हणजे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नितीन नांदगावकर यांनी त्यांच्या कार्यालयात असलेला राज ठाकरे यांचा फोटोही बदलला, त्यांच्या जागी आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. अर्थात शिवसैनिकांप्रमाणेच मनसैनिकांसाठीही बाळासाहेब वंदनीय असेच आहेत.


पक्षांतर्गत वाद

नितीन नांदगावकर यांनी पक्षांतर्गत वादाला कंटाळून शिवसेनेत प्रवेश केल्याचं सांगितलं. रात्रीच्या वेळी मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांनतर नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं कारण स्पष्ट करण्यासाठी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये नितीन नांदगावकर ज्या ठिकाणी उभे आहेत, त्यामागे राज ठाकरे यांचा फोटो होता. त्या जागी आता बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे.


बाळासाहेबांचा शिवसैनिक

नितीन नांदगावकर यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.  व्हिडिओच्या सुरूवातीला 'जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र सैनिक' असं म्हणणारे नितीन नांदगावर आता 'जय महाराष्ट्र मी वंदनीय बाळासाहेबांचा शिवसैनिक', असं म्हणताना दिसत आहेत.
हेही वाचा -

मनसेचे आक्रमक नेते नितीन नांदगावकर शिवसेनेत

राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा रद्द, मनसैनिकांचं लक्ष आता पुढच्या सभेकडेसंबंधित विषय
Advertisement