सर्वसामान्यांना दिलासा, भाज्यांचे दर घटले


सर्वसामान्यांना दिलासा, भाज्यांचे दर घटले
SHARES

महागाईची झळ सोसणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी एक खूशखबर आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर घटले आहेत. परराज्यातून येणाऱ्या गाजर, मटार, फ्लॉवर गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर दाखल झाले असून सर्व भाज्यांचे दर ओसरले आहेत. यामुळे ग्राहकांनी कडधान्यांकडे पाठ फिरवली आहे.


कमी दरात भाज्यांची विक्री

भाज्या आणि महागाई हे समीकरण असलं तरी सध्या घाऊक भाज्या काहीशा स्वस्त झाल्या आहेत. भाज्यांचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याने कमी दरात भाज्यांची विक्री होत आहे. सध्या बाजारात भेंडी, गवार, वांगी या भाज्यांचे दर १६ ते २० रुपये प्रतिकिलो असून गेल्या आठवड्यात या भाज्यांची विक्री २५ ते ३० रुपये दरानं होतं होती. त्याशिवाय वटाणाच्या किमतीत ५० टक्क्यानं घट झाली असून, सध्या वटाण्याची किमत प्रतिकिलो ३५ ते ४० रुपये आहे. भाज्यांच्या दरात ५० टक्के घट झाल्यानं महागाईची झळ सोसणाऱ्या ग्राहकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

भाज्यांची आवक घटली तर दर वाढतात, हा नियम आहे. मात्र सध्या बाजारात मुबलक प्रमाणात भाज्या उपलब्ध असून बहुतांश ग्राहक हे भाज्या खरेदी करण्यावरच भर देत आहेत. यामध्ये परराज्यातील भाज्यांची संख्या अधिक असून मटार मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. त्यामुळे भेंडी, गवार यांसारख्या भाज्यांचे दर कमी झाले आहेत.
- राजाराम दोंडकर, उपसचिव, एपीएमसी भाजी मार्केट

सध्या थंडीचं वातावरण असल्यानं नोव्हेंबर डिसेंबर हा महिना आरोग्यदायी मानला जातो. यंदा भाज्यांचे दरही कमी झाल्याने मुबलक प्रमाणात भाज्यांची खरेदी करता येत आहेत. त्याशिवाय गृहिणींना स्वस्त दरात ताज्या भाज्या मिळत असल्यानं घरात कडधान्यांची खरेदी कमी झाली आहे.
- आशा मटकर, गृहिणी


भाज्या दर (एक किलो)

  • कोबी - ४० रुपये
  • गवार - ३० रुपये
  • मटार - ४० रुपये
  • फ्लॉवर - ३० रुपये
  • मेथी - १५ रुपये (जुडी)
  • पालक - १५ रुपये (जुडी)
संबंधित विषय