ट्रॅफीक पोलिसांसाठी 'हवा बदलो'

 Mumbai
ट्रॅफीक पोलिसांसाठी 'हवा बदलो'

लोअर परळ - मुंबईत वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर गेल गॅस कंपनीच्या वतीने दिग्दर्शक कार्मिक वर्मा यांनी केलेल्या ‘हवा बदलो’ व्हीडिओचे स्क्रिनिंग करण्यात आले. लोअर परळ इथल्या फिनिक्स मॉल येथील पीव्हीआर सिनेमात हा कार्यक्रम झाला. ट्रॅफीक पोलिसांना होणाऱ्या त्रासावर ही व्हीडिओ क्लीप तयार करण्यात आली आहे. या व्हिडिओत विवेक ओबेरॉय, कल्की, वीर दास, स्वरा भास्कर आणि गोविंद नामदेव हे प्रदुषणामुळे ट्रॅफीक पोलिसांना होणारा त्रास आणि त्यांच्या समस्यांबद्दल जनजागृती करणारे संदेश देताना दिसत आहेत.

या कार्यक्रमाला अभिनेता विवेक ओबेरॉय, स्वरा भास्कर आणि वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे उपस्थित होते. या वेळी ट्रॅफीक पोलिसांच्या जवानांना प्रदूषणापासून वाचण्यासाठी मास वाटण्यात आले. आपल्यासाठी दिवसरात्र आपली संरक्षण करणाऱ्या पोलिसांचा आपण सन्मान केला पाहिजे, असं आवाहन अभिनेता विवेक ओबरॉय याने या वेळी केलं.

Loading Comments