कामाठीपुऱ्यात प्रचाराला सुरुवात

 Mumbai
कामाठीपुऱ्यात प्रचाराला सुरुवात

कामाठीपुरा - प्रभाग क्रमांक 213 चे काँग्रेसचे उमेदवार जावेद जुनेजा यांनी सोमवारी दुपारी प्रचाराचा नारळ फोडला. या वेळी जुनेजा यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे काळबादेवी विधानसभाचे आमदार अमीन पटेलही उपस्थित होते.

जुनेजा हे आधी प्रभाग क्रमांक 223 चे नगरसेवक होते. मात्र हा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने त्यांनी प्रभाग क्रमांक 213 मध्ये उडी घेतली. 213 मधून काँग्रेसचे 208 चे नगरसेवक मनोज जामसुतकर हे देखील इच्छुक होते. मात्र जुनेजा हे अमीन पटेल यांच्या जवळचे असल्याने त्यांना तिकीट देण्यात आले असे बोलले जाते. प्रभाग क्रमांक 213 मधून मनसेचे दृष्टीहिन उमेदवार विनोद अरगिले यांच्याकडून चांगलीच टक्कर मिळण्याचे चिन्ह आहे. विनोद अरगिले हे दृष्टीहिन असूनही विभागात त्यांनी बरीच कामे केली आहेत. तर जुनेजा हे कामाठीपुरा विभासाठी पूर्णपणे नवे आहेत.

Loading Comments