Advertisement

पालिकेतर्फे मतदार जागृती मोहीम


पालिकेतर्फे मतदार जागृती मोहीम
SHARES

मुंबई - महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2017मध्ये जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, यासाठी पालिका मतदार जागृती मोहीम राबवणार आहे. पालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ही मतदार जागृती मोहीम राबवण्यात येणार आहे.
या संदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरं) संजय देशमुख यांच्या दालनात विविध प्राधिकरणांची आढावा बैठक झाली. बैठकीला सहकारी गृहनिर्माण संस्थांचे निबंधक, जे.जे. स्कूल ऑफ ऑर्टस, विविध वाहतूक आस्थापनांतील (बीएसटी, मध्य-पश्चिम रेल्वे, राज्य परिवहन महामंडळ) व्यवस्थापक, परिवहन आयुक्त, हॉटेल चालक संघटनेच्या प्रतिनिधी आदी उपस्थित होते. या मोहिमेसाठी विविध प्राधिकरणांना 15 जानेवारी 2017पर्यंत पालिकेतर्फे प्रचार साहित्य देण्यात येणार आहे. विविध माध्यमांचा आपापल्या कार्यकक्षेत जास्तीत जास्त उपयोग करून मतदार जागृती मोहीम राबवण्याची सूचना या वेळी देशमुख यांनी केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा