Advertisement

मतदारांनो यादीत नाव तपासून घ्या


मतदारांनो यादीत नाव तपासून घ्या
SHARES

मुंबई- मुंबई महानगर पालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी 2014ची विधानसभा निवडणूक मतदार यादी नव्याने अपडेट करण्यात आली आहे. त्यामुळे आपले नाव मतदार यादीत आहे की नाही? हे तपासून घेणे प्रत्येक मतदारासाठी गरजेचे ठरणार असल्याने आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासून घ्या, गाफील राहू नका, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी केले आहे. एसआर पुनर्वसन, पुर्नविकास आणि इतर कुठल्याही कारणाने झालेले स्थलांतर यामुळे मतदारांचे नाव नव्या मतदार यादीत आहे की नाही याची खातरजमा करावी असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. अपडेट झालेल्या मतदार यादीतील नावांची दुरूस्ती करण्यासाठी 15 सप्टेंबर ते 14 आक्टोबरदरम्यान पालिकेकडून मुंबईभर विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यानुसार नजीकच्या केंद्रात जाऊन 14 आक्टोबरपर्यंत नाव आहे का हे मतदारांना तपासता येणार आहे. जर नाव नसेल तर नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया मतदारांना पूर्ण करावी लागणार आहे. नागरिकांना अधिक माहितीसाठी 1800221950 या क्रमांकावर संपर्कही साधता येईल.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा