Advertisement

गिरण्यांच्याच जागेवर की पनवेलमध्ये घर हवंय? पनवेलमधील विजेत्यांना विकल्प


गिरण्यांच्याच जागेवर की पनवेलमध्ये घर हवंय? पनवेलमधील विजेत्यांना विकल्प
SHARES

गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारनं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) च्या भाडेतत्वावरील गृहप्रकल्प योजनेतील घरं गिरणी कामगारांना उपलब्ध करून दिली आहेत. त्यानुसार पनवेल येथील मौजे कोनमधील २४१७ घरांची सोडत काढण्यात आली असून या घरांचं वितरण अद्याप झालेलं नाही.

असं असताना जर एखाद्या विजेत्यांला अजूनही वाटत असेल की आपल्याला पनवेलमध्ये घर नको, आपल्या मुळ गिरण्यांच्या जागेवरच घर हवंय. तर अशा गिरणी कामगारांसाठी दिलासादायक बातमी आहे.


म्हाडाकडून विकल्प

घर विजेत्यांना म्हाडानं विकल्प उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार ज्या विजेत्याला पनवेलमध्येच घर हवं आहे त्याला पनवेलचा तर ज्याला मुंबईत गिरण्यांच्या जागेवर घर हवं असेल त्याला गिरण्यांच्या जागेचा विकल्प निवडता येणार आहे. पण एक महत्त्वाचं जर तुम्ही गिरण्यांच्या जागेचा विकल्प निवडला तर तुम्हाला पनवेलच्या घरावरील हक्क सोडावा लागणार आहे.


गिरण्यांच्या जागाही मिळतील

१ लाख ४८ हजार गिरणी कामगारांना मुंबईत घर देणं शक्य नसल्यानं एमएमआरडीएची घरं कामगारांना देण्यात येत आहेत. त्यानुसार २ डिसेंबर २०१६ मध्ये म्हाडाच्या माध्यमातून पनवेलमधील २४१७ घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. तर यापुढंही एमएमआरडीएची घरं जसजशी उपलब्ध होतील तसतशी घरांची सोडत काढण्यात येणार आहे. दरम्यान, सध्या म्हाडाकडून बाॅम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिलमध्ये घरांचं काम सुरू आहे.  तर येत्या काळात म्हाडाला अन्य काही गिरण्यांच्या जागा ताब्यात येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळं त्या गिरण्यांवरही घरांचं काम सुरू होईल.


म्हाडा कार्यालयात विनामुल्य अर्ज 

अशावेळी जर पनवेलमधील विजेत्या कामगारांला वाटत असेल की आपल्याला आपल्याच गिरणीच्या जागेवर, मुंबईत घर हवं आहे तर त्याची ही इच्छा आता पूर्ण होणार आहे. म्हाडानं त्यासाठी विकल्प अर्ज सुरू केले आहेत. त्यानुसार ३० जुलै २०१८ पर्यंत म्हाडाच्या https://mhada.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तसंच म्हाडा मुख्यालयातील उपमुख्य अधिकारी (गिरणी) कक्ष क्रमांक २०५, पहिला मजला, वांद्रे पूर्व येथे विनामुल्य हे अर्ज उपलब्ध होतील.

तर ३० जुलैपर्यंत म्हाडा कार्यालयात हजर राहून, ओळख पटवून स्वच्छेनुसार पनवेल वा गिरण्यांच्या जमिनीवरील घर यापैकी एक विकल्प निवडत अर्ज सादर करणं बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे गिरणी कामगारांनो शक्य तितक्या लवकर विकल्प अर्ज भरत आपला पर्याय निवडा असं आवाहन म्हाडानं केलं आहे.


पनवेलचाच विकल्प 

दरम्यान मॉडर्न मिल, कमला मिल, खटाव मिल, फिनिक्स मिल, कोहिनूर मिल नंबर १ (एनटीसी), कोहिनूर मिल नंबर -२ (एनटीसी), पोद्दार मिल (एनटीसी), मफतलाल मिल नंबर-१, मफतलाल मिल नंबर-२, मुकेश टेक्सटाईल मिल या गिरण्यांची जमीन म्हाडाला मिळणार नाही. त्यामुळं या गिरण्यांमधील ज्या कामगारांना पनवेलमध्ये घर लागलं आहे त्यांच्यासाठी पनवेलचाच विकल्प आहे. तेव्हा अशा कामगारांनो लक्षपूर्वक पनवेलचाच विकल्प निवडा.



हेही वाचा -

घाटकोपरमध्ये शॉक लागून महिलेचा मृत्यू

नागपूरपेक्षा आमची मुंबईच बरी



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा