Advertisement

घाटकोपरमध्ये शॉक लागून महिलेचा मृत्यू


घाटकोपरमध्ये शॉक लागून महिलेचा मृत्यू
SHARES

घाटकोपरमध्ये शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.  तर, एक मुलगी यामध्ये जखमी झाली.  उषा सावंत (४०) असं मृत महिलेचं नाव अाहे. तर समीधा सावंत (५) ही मुलगी जखमी झाली. दोघी मानखुर्द-घाटकोपर लिंकरोड येथील पीएमजीपी कॉलनीमध्ये राहत आहेत.


शॉट सर्कीटमुळं शाॅक

शनिवारी दुपारी १.४७ वाजेच्या सुमारास पीएमजीपी कॉलनीत शॉट सर्कीट झाल्यामुळं दोघी गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना तातडीनं उपचारासाठी कोलेकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र,  उपचारा रम्यान उषा सावंत यांचा मृत्यू झाला असून समीधा सावंत हिची प्रकृतीत सुधारल्याचं डॉ. समीधा यांनी सांगितलं.



हेही वाचा -

राणीबागेत येणार नवा पाहुणा, पेंग्विन देणार गोड बातमी

मुंबईत पावसाचा जोर वाढणार - हवामान विभाग



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा