Advertisement

मुंबईत पावसाचा जोर वाढणार - हवामान विभाग


मुंबईत पावसाचा जोर वाढणार - हवामान विभाग
SHARES

मुंबईसह राज्याच्या इतर भागात काही दिवसांपासून पावसानं चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.


ठाणे, डोंबिवलीत पाणी तुंबलं

शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत मुंबई शहरात १३.५९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली अाहे. पूर्व उपनगरात सर्वाधिक ३७.५१ मिमी तर पश्चिम उपनगरत २७.९७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसंच येत्या दोन दिवसात म्हणजे रविवारी आणि सोमवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्याता हवामान विभागानं वर्तवली आहे. मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे मुंबईतील सायन, दादर, प्रभादेवी, हिंदमाता परिसरासह ठाणे, डोंबिवली परिसरात पावसाचं पाणी तुंबलं आहे. 

शुक्रवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळं कल्याण रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळं मध्य रेल्वे वाहतूक सेवा उशीरानं सुरु आहे. प्रत्येक गाडी अर्धातास उशीरानं स्थानकात येत असल्यामुळं प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.



हेही वाचा -

राणीबागेत येणार नवा पाहुणा, पेंग्विन देणार गोड बातमी

यंदा 'या' धबधब्यांवर पर्यटकांना प्रवेश बंदी



 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा