कचरा शेडची दुरवस्था

 Sandhurst Road
कचरा शेडची दुरवस्था

सँडहर्स्ट रोड- शनी मंदिर रोडवर असणाऱ्या कचरा शेडची सध्या दुरवस्था झाली असून पालिका कर्मचारी लक्ष देत नसल्याचं समजते. कचरा शेडवर एकही कचऱ्याची गाडी येत नाही. एवढंच नव्हे तर कचरा डब्ब्यांच्या नोंदीसाठी देखील कुणी येत नाही. त्यामुळं या कचरा शेडची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. या शेडमध्ये ये-जा करणारा प्रत्येक जण नाक मुठीत घेऊनच ये-जा करत असतात. त्यामुळं या परिस्थिकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Loading Comments