दक्षिण मुंबईतील 'या' भागात बुधवार, गुरूवारी पाणीकपात

माझगावमधील भंडारवाडा हिल जलाशयाच्या दुरूस्तीचं काम करण्याआधी मुंबई महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी या जलाशयातून होणारा पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे.

SHARE

माझगावमधील भंडारवाडा हिल जलाशयाच्या दुरूस्तीचं काम करण्याआधी मुंबई महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी या जलाशयातून होणारा पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे २५-२६ सप्टेंबर रोजी दक्षिण मुंबईतील वाॅर्ड ए, वाॅर्ड बी आणि वाॅर्ड ई मधील परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.

‘या’ परिसरात पाणीकपात

‘ए’ वाॅर्डातील नेव्हल डाॅकयार्ड, बी वाॅर्डातील पी. डिमेलो रोड, संत तुकाराम मार्ग, केशवजी नाईक रोड, जंजिकार स्ट्रीट, मोहम्मद अली रोड, पायधुनी इ. परिसरात पाणीकपात होईल.

तर, ई वाॅर्डातील बीपीटी, डाॅकयार्ड रोड, जे.जे. रुग्णालय आणि ना.म.जोशी मार्ग परिसरात देखील पाणीकपात करण्यात येणार आहे.हेही वाचा-

नायर रुग्णालयातील मृत राजेश मारूच्या कुटुंबाला १० लाखांची भरपाई

भूलेश्वरमधून ६६ लाखांची रोकड जप्तसंबंधित विषय
ताज्या बातम्या