Advertisement

मुंबईत पावसाची दमदार हजेरी, ठिकठिकाणी साचले पाणी


मुंबईत पावसाची दमदार हजेरी, ठिकठिकाणी साचले पाणी
SHARES

मुंबईसह उपनगरात सोमवारी पावसाने दमदार बॅटिंग केली. सांताक्रूझ, खार, वांद्रे, माहीम, माटुंगा, दादर अशा अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दादरच्या अनेक सखल भागात पाणी साचले होते.

सोमवारी संध्याकाळी 8 वाजल्यापासून विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीच्या समस्येलाही मुंबईकरांना सामोरे जावे लागले. आधी कोकणात पाऊस सक्रिय झाला होता. त्यानंतर दोन दिवस जोरदार पाऊस पडेल असा, अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. पण, त्या दोन दिवसात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलाच नाही. अखेर सोमवारपासून पावसाने मुंबईसह महाराष्ट्रात हजेरी लावली. पुढील चोवीस तासातही मुंबईसह कोकणसह उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडेल असा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

संबंधित विषय