पाऊस पडला वितभर, शिवाजी पार्क भरले फूटभर


  • पाऊस पडला वितभर, शिवाजी पार्क भरले फूटभर
SHARE

मुंबईत गुरुवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मेघगर्जनेसह कोसळलेल्या पावसाने मुंबईतील बहुतांश भाग पुन्हा एकदा पाण्याखाली जाऊन 'पाणीच पाणी चोहीकडे' अशी अवस्था निर्माण झाली होती. वितभर पडलेल्या या पावसामुळे कधी नव्हे, ते शिवाजी पार्कमधील सेनापती बापट यांच्या पुतळ्याच्या चौकात फूटभर पाणी साचले होते. खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थाना शेजारीही पाणी तुंबल्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.


दादर रेल्वे स्थानकाबाहेरही पूर

गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळायला सुरुवात झाली. परंतु त्यानंतर साडेसातच्या सुमारास मेघ गर्जनेसह मोठ्या पावसाची बरसात झाली. अवघा एक ते दीड कोसळलेल्या या पावसामुळे दादरमधील प्लाझा सिनेमाजवळी न. चि. केळकर मार्गावर पाणी तुंबले. तर दादर रेल्वे स्थानकाबाहेरही मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. त्यामुळे प्रवाशांना या पाण्यातूनच पुढे सरकावे लागत होते.शिवाजी पार्ककरांनाही मिळाला अनुभव

आजवरच्या इतिहासामध्ये शिवाजी पार्कमध्ये पाणी तुंबण्याचा प्रकार घडला नव्हता. परंतु सेनापती बापट यांच्या पुतळ्याच्या चौकात आणि त्यांना जोडणाऱ्या एम.बी. राऊत मार्ग, केळुस्कर मार्ग आदी रस्त्यांवर फूटभर पाणी तुंबले होते. त्यामुळे शिवाजी पार्ककरांना या साचलेल्या पाण्यामुळे तोंडात बोटे घालण्याची वेळ आली होती. वांद्रे पश्चिम भागातही अशाचप्रकारे पाणी तुंबण्याचे प्रकार घडले असून संबंधित विभाग कार्यालयाच्या माध्यमातून या पाण्याचा निचरा करण्यात येत असल्याचे आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्यावतीने सांगण्यात येत आहे.


दादरमध्ये ४४ मि.मी पावसाची नोंद

कुलाबा वेधशाळेच्यावतीने ५४ मि.मी तर सांताक्रूझ वेधशाळेच्यावतीने ४३ मि.मी एवढ्या  पावसाची नोंद झाली आहे. महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्यावतीने मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दादरमध्ये ४४ मि.मी, शीवमध्ये २७ मि.मी, परळ, लालबागमध्ये २३ मि.मी, वरळी २६ मि.मी, प्रभादेवीमध्ये १२ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. 

पूर्व उपनगरातील चेंबूरमधील २६ मि.मी,  कुर्ला ३२ मि.मी, चेंबूर १२ मि.मी,  तर पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ ४१,  विलेपार्ले ४२मि.मी,  वांद्रे ४३ मि.मी, जुहू ३९ मि.मी, अंधेरी पश्चिम ३० मि.मी, अंधेरी पूर्व  २९ मि.मी, दिंडोशी १७मि.मी आणि कांदिवली १४ मि.मी एवढ्या पावसाची नोंद सायंकाळी सात ते आठ या वेळेत झाली आहे.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)संबंधित विषय
ताज्या बातम्या