Advertisement

पाणी जपून वापरा; 'या' भागात २ व ३ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा नाही

जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार असून, ३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

पाणी जपून वापरा; 'या' भागात २ व ३ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा नाही
SHARES

मुंबई महापालिकेच्या 'जी दक्षिण' आणि 'जी उत्तर' विभागातील गावडे चौक, सेनापती बापट मार्ग इथं असलेल्या ब्रिटिशकालीन १४५० मिली मीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) मुख्य जल वाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचं काम २ व ३ डिसेंबर रोजी हाती घेण्यात येणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार असून, ३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे 'जी दक्षिण' आणि 'जी उत्तर' विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तर काही परिसरांमध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे.

या परिसरात पाणीपुरवठा नाही

जी दक्षिण

बुधवार २ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ३ (डिलाईल रोड);
दुपारी ३.३० ते सायं. ७ (सिटी सप्लाय)
परिसर - ना. म. जोशी मार्ग,

बी. डी. डी. चाळ, प्रभादेवी, जनता वसाहत, आदर्श नगर, एलफिस्टन (लोअर परळ)

जी उत्तर

बुधवार २ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ ते ७ तसंच संध्याकाळी ७ ते रात्री १०

परिसर -  एलफिस्टन (लोअर परळ), काकासाहेब गाडगीळ मार्ग, सेनापती बापट मार्ग, गोखले मार्ग, वीर सावरकर मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टि. एच. कटारीया मार्ग, कापड बाजार, माहीम (पश्चिम) पूर्ण परिसर, माटुंगा (पश्चिम) आणि दादर (पश्चिम) परिसर.

जी दक्षिण

गुरुवार ३ डिसेंबर रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ७.४५  (डिलाईल रोड)

परिसर - ना. म. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग

या परिसरांमध्ये कमी दाबाने होणार पाणीपुरवठा

जी दक्षिण

गुरुवार ३ डिसेंबर रोजी पहाटे ४ ते सकाळी ७ (क्लार्क रोड)
परिसर - धोबी घाट, सातरस्ता या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा