Advertisement

मुंबईतील 'या' भागांमध्ये ९ , १० जुलैला पाणीपुरवठा बंद

मुंबईतील काही भागांमध्ये मंगळवारी ९ जुले आणि बुधवार १० जुलै या दोन्ही दिवशी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. तानसा पश्चिम या जलवाहिनेचे आणि माहीम फाटकाजवळील जलवाहिनी खंडीत करण्याचे काम पालिकेच्या जल विभागातर्फे करण्यात येणार आहे.

मुंबईतील 'या' भागांमध्ये ९ , १० जुलैला पाणीपुरवठा बंद
SHARES

मुंबईतील काही भागांमध्ये मंगळवारी जुले आणि बुधवार १० जुलै या दोन्ही दिवशी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. तानसा पश्चिम या जलवाहिनेचे आणि माहीम फाटकाजवळील जलवाहिनी खंडीत करण्याचे काम पालिकेच्या जल विभागातर्फे करण्यात येणार आहे. त्यामुळं अनेक मुंबईकरांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. 

जलवाहिनीच्‍या दुरुस्‍तीचं काम

अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि धारावी या परिसरात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहेमहापालिकेतर्फे पवई येथील तानसा पश्चिम १८०० मि.मी. व्‍यासाच्‍या जलवाहिनीच्‍या दुरुस्‍तीचं काम, तसंच जी-उत्तर विभागातील धारावी येथील माहीम फाटकाजवळ १८०० मि.मी. व्‍यासाची वैतरणा व अप्‍पर वैतरणा जलवाहिनी खंडि‍त करण्‍याचं काम हाती घेण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी १२ ते बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळं जवळपास २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

या भागांत पाणीपुरवठा बंद

के-पूर्व अंधेरी: छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट, एम. आय. डी. सी. ट्रान्‍स रेसिडेन्‍सी, सुभाषनगर, सारीपुतनगर, विजयनगर, पोलिस कॅम्‍प, मरोळ गावठाण, मिलिटरी रोड, भवानीनगर, चिमटपाडा, सगबाग, मकवाना रोड, ओमनगर, सहार गाव, प्रकाशवाडी, गोविंदवाडी, इस्‍लामपुरा, पारसीवाडा, चकाला गांवठाण, जे. बी. नगर, मुळगाव डोंगरी, बामणवाडा, कबीरनगर, लेलेवाडी, टेक्निकल क्षेत्र, तरुण भारत सोसायटी, एअर पोर्ट परिसर.

एच-पूर्व: वांद्रे टर्मिनस परिसर.

जी-उत्तर: धारावी सायंकाळी ४ ते ९ या वेळेतील पाणीपुरवठा बंद, धारावी मेन रोड, गणेश मंदिर रोड, . के. जी. नगर रोड, कुंभारवाडा, संत गोराकुंभार रोड व दिलीप कदम मार्ग.

जी-उत्तर: धारावी सकाळी ४ ते दुपारी १२ या वेळेतील पाणीपुरवठा बंद, प्रेम नगर, नाईक नगर, ६०’ रोड, जस्मिन मिल रोड, मांटुगा लेबर कॅम्प, ९०’ रोड, एम. जी. रोड, धारावी लूप रोड, संत रोहिदास रोड.हेही वाचा -

गोवंडी परिसरात इमारत कोसळली, ८ जण जखमी

मुंबईसह राज्यातील रिक्षाचालक ९ जुलैला संपावरसंबंधित विषय
Advertisement