Advertisement

गोवंडी परिसरात इमारत कोसळली, ८ जण जखमी

मुंबईतील गोवंडी परिसरात इमारत कोसळून ८ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतील जखमींची नावं अद्याप समजलेली नसून, घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस धाव घेतली आहे.

गोवंडी परिसरात इमारत कोसळली, ८ जण जखमी
SHARES

मुंबईतील गोवंडी परिसरात इमारत कोसळून ८ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतील जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी झुबेदा बेगम सय्यद(७०), आयेशा बानू सय्यद(२१), नूरजहाँ बानू सय्यद (४५) या तिघींच्या प्रकृतीत सुधारणा आहे, तर इतर पाचही जणांवर अद्याप उपचार सुरू असल्याची माहिती राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.  

कोसळण्याचं कारण अस्पष्ट

गोवंडी येथील शिवजी नगर येथे मध्यरात्री दुमजली इमारतीचा वरच भाग पुर्णपणे कोसळला. इमारतीचा हा भाग कोसळण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलिसांनी तातडीनं धाव घेतली. याप्रकरणी  पोलीस अधिक तपास करत आहेत.

संरक्षक भिंत

मागील काही दिवसांपूर्वी मुंबईतील मालाड इथही संरक्षक भिंतीचा भाग कोसळून २६ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर चांदिवलीतल्या संघर्ष नगर येथील रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेला होता.हेही वाचा -

'त्यांनी' भागवली ६ गावांची तहान

मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी 'बेस्ट'Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा