Advertisement

'त्यांनी' भागवली ६ गावांची तहान

भारतातील सर्वात मोठी थ्रीपीएल सोल्यूशन पुरवठादार असलेल्या महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. (एमएलएल) कंपनीने महाराष्ट्राच्या शाहापूर तालुक्यातील टेंभा गावपंचायतीअंतर्गत येणाऱ्या ६ खेड्यांसाठी पाणी प्रकल्प स्थापन केला आहे.

'त्यांनी' भागवली ६ गावांची तहान
SHARES

भारतातील सर्वात मोठी थ्रीपीएल सोल्यूशन पुरवठादार असलेल्या महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. (एमएलएल) कंपनीने महाराष्ट्राच्या शाहापूर तालुक्यातील टेंभा गावपंचायतीअंतर्गत येणाऱ्या ६ खेड्यांसाठी पाणी प्रकल्प स्थापन केला आहे. शुद्ध पाण्याचा हा प्रकल्प या परिसरातील सर्वात मोठा प्रकल्प असून तो बलवाडी गावातील सरकारी पाइपलाइनमधून १ लाख लीटर पाण्याचे पंपिंग करेल आणि गनगडपाडा, माधेपाडा, कर्पाडेपाडा, ठाकरपाडा,पारधी पाडा आणि बेलवंदी या खेड्यांना त्याद्वारे पाणीपुरवठा केला जाईल.

पाण्याचे दुर्भीक्ष

या उपक्रमाद्वारे या पतिसरातील पाण्याचे दुर्भीक्ष कमी करून रहिवाशांचे जीवनमान उंचावण्याचे एमएलएलचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाला एमएलएलच्या व्यावसायिक भागिदारांचाही पाठिंबा लाभला असून हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या काही वर्षांत महिंद्रा लॉजिस्टिकने विविध प्रकारचे विकास उपक्रम हाती घेतले असून त्यात मूलभूत सुविधा विकास, शिक्षण, आरोग्य आणि गावकऱ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन इत्यादींचा समावेश आहे.


पाणी पुरवठा प्रकल्प

महिंद्रा लॉजिस्टिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पिरोजशॉ सरकारी म्हणाले, ‘महिंद्रा लॉजिस्टिकचा समाजाचे ऋण फेडण्यावर गाढ विश्वास आहे. समाजाला सक्षम करण्याच्या तळमळीने आम्ही दत्तक घेतलेल्या टेंभा गावातील सहा खेड्यांसाठी फायदेशीर ठरणारा पाणी पुरवठा प्रकल्प स्थापन केला आहे. विविध मानवी, पर्यावरणीय आणि जागरूकता उपक्रमांद्वारे आम्ही या गावातील रहिवाशांचे आयुष्य सकारात्म मार्गाने उंचावण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा पाणी प्रकल्प त्याच दिशेने केलेला प्रयत्न आहे.’

स्वप्न सत्यात उतरवले

टेंभा समूह गाम्र पंचायतच्या सरपंच रेश्मा आमले म्हणाल्या, ‘गेल्या इतक्या वर्षांत आमच्या गावातील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत करणाऱ्या महिंद्रा लॉजिस्टिकचे आम्ही आभारी आहोत. त्यांनी आमचे पाणी प्रकल्पाचे स्वप्न सत्यात उतरवले असून त्यामुळे आम्हाला स्वतंत्र झाल्यासारखे वाटत आहे. यापूर्वी केवळ एक बादली पाणी मिळवण्यासाठी आम्हाला अक्षरशः दररोज 2-3 किलोमीटर चालत जावे लागायचे. आता आम्हाला घरी आमच्या कुटुंबाला आणि मुलांना जास्त वेळ देता येईल. यापुढील काळातही महिंद्रा लॉजिस्टिकचा असाच पाठिंबा मिळत राहावा अशी गावाची इच्छा आहे.’



हेही वाचा -

मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी 'बेस्ट'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा