Advertisement

मुंबईसह राज्यातील रिक्षाचालक ९ जुलैला संपावर

रिक्षानं प्रवास करण्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यात अन्य शहरांमधील रिक्षाचालक मंगळवार ९ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.

मुंबईसह राज्यातील रिक्षाचालक ९ जुलैला संपावर
SHARES

रिक्षानं प्रवास करण्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यात अन्य शहरांमधील रिक्षाचालक मंगळवार ९ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. रिक्षा भाडेवाढ तत्काळ करावी, अवैध प्रवासी वाहतुकीबरोबरच ओला-उबेरसारख्या टॅक्सी सेवा बंद करावी या मागण्यांसाठी रिक्षाचालकांनी संपाचा इशारा दिला आहे.

या आहेत प्रमुख मागण्या:

  • ओलाउबरसारख्या अवैध टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करावी.
  • रिक्षा चालक-मालकांसाठी असलेले कल्याणकारी महामंडळ परिवहन खात्यांतर्गत असावे.
  • विमा कंपनीत भरण्यात येणारे पैसे तिथे न भरता कल्याणकारी महामंडळात जमा करावे.
  • चालक-मालकांना पेन्शनउपदान (ग्रॅज्युईटी), भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय मदत दिली जावी.
  • जुन्या हकिम समितीच्या शिफारशीनुसार तातडीने रिक्षा भाडेवाढ करावी.
  • चार ते सहा रुपये भाडेवाढ करावी.
  • बेकायदा प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी विशेष भरारी पथकाची नियुक्ती करावी.

वारंवार बैठका घेतल्या

या प्रकरणी राज्य परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेऊन त्यांच्यासमोर मागण्या मांडण्यात आला. परंतु, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत सरकारकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आलं नसल्याचं रिक्षाचालक संघटनांचं म्हणणं आहे.

सर्वसामान्यांचे हाल

संपात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांमधील अनेक रिक्षाचालक सहभागी होणार आहेत. त्यामुळं दररोज रिक्षानं प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांचे हाल होणार आहेत. त्यामुळं आता सरकार रिक्षाचालकांच्या मागण्या पूर्ण करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

गोवंडी परिसरात इमारत कोसळली, ८ जण जखमी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा