Advertisement

शुक्रवारी मुंबईतील 'या' भागात पाणीपुरवठा बंद

ही कामे 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेपासून 13 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 24 तास सुरु राहणार आहे.

शुक्रवारी मुंबईतील 'या' भागात पाणीपुरवठा बंद
SHARES

मुंबईतील (mumbai) के पूर्व विभाग, एच पूर्व विभाग आणि जी उत्तर विभागातील मोठ्या आकाराच्या जलवाहिनी जोडणीची कामे हाती घेतली जाणार आहेत.

12 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेपासून 13 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

परिणामी, के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद (water cut) राहणार आहे. तर के पूर्व विभागात काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा (water supply) होणार आहे.

के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागातील विविध ठिकाणची 1800 मिलीमीटर व्यासाची तानसा पश्चिम जलवाहिनी, 2400 मिलीमीटर व्यासाची वैतरणा जलवाहिनी आणि जी उत्तर विभागातील 1500 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडणीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे.

ही कामे 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेपासून 13 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 24 तास सुरु राहणार आहे.

यासाठी के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे.

तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून तसेच गाळून प्‍यावे, महानगरपालिकेस (bmc) सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.



हेही वाचा

बनावट ई-चलान लिंक्सपासून सावधान

गारगाई नदी धरण मुंबईचे आठवे जलस्त्रोत ठरणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा