Advertisement

भारतातील 'हे' महत्त्वाचे कायदे सर्वांना माहित पाहिजेच

एखादा कायदा तोडल्यावर जर तुम्हाला त्याकरिता दंड भरावा लागला असेल तर त्या दिवशी तुम्हाला पुन्हा ट्राफिक पोलिसांनी पकडलं तर दंड भरावा लागत नाही.

भारतातील 'हे' महत्त्वाचे कायदे सर्वांना माहित पाहिजेच
SHARES

आपण ज्या देशात राहतो त्या देशातील सुरक्षा व्यवस्था आणि न्यायव्यवस्थेबाबत आपल्याला संपूर्ण माहिती असणं खूप गरजेचे असतं. कारण ते आपल्यासाठीच असतात. पण असे काही कायदे देखील असतात जे खूप लोकांना माहित नसतात. ते जाणून घेणे आपल्यासाठी गरजेचं असतं. हेच कायदे आज जाणून घेऊयात.

१) एखाद्या जोडप्याला एक मुलगा आहे आणि त्यांना आणखी एकाला दत्तक घ्यायचं असेल तर ते मुलाला दत्तक घेऊ शकत नाही. कारण कायद्यानुसार ते बेकायदेशीर आहे. हिंदू अडॉप्शन अॅण्ड मेन्टेनन्स अॅक्ट १९५६ नुसार, विवाहित जोडपं एकाच लिंगाच्या दोन मुलांना दत्तक घेऊ शकत नाही. म्हणजे जर त्या जोडप्याला आधी मुलगा आहे तर त्यांना मुलीला दत्तक घ्यावं लागेल.

२) एखादी महिला ही तिची तक्रार नोंदवण्याकरिता पोलीस ठाण्यात जाऊ शकली नाही तर ती डेप्युटी कमिशनर किंवा पोलीस कमिशनरला आपली तक्रार ई मेल किंवा रजिस्टर्ड पोस्टाने पाठवू शकते.

३) इंडियन साराईस अॅक्ट १८६७ नुसार कुठलीही व्यक्ती कुठल्याही हॉटेलमधून स्वतःसाठी किंवा स्वतःच्या पाळीव जनावरांसाठी मोफत पाणी मागू शकते. तसेच ती हॉटेलचे बाथरूम वापरू शकते.

४) जेव्हा तुम्ही कुठलीही स्थावर संपत्ती म्हणजेच जमीन किंवा घर खरेदी करता तेव्हा त्याची सूचना वृत्तपत्रातून देणं गरजेचं असतं. तुम्ही ती कुठल्याही वृत्तपत्रात देऊ शकता.

५) हिंदू विवाह कायदा १९५५ च्या कलम १४ नुसार कुठल्याही विवाहित जोडप्याला लग्नाला एक वर्ष होईपर्यंत घटस्फोट घेता येत नाही. लग्नाला एक वर्ष होइपर्यंत ते घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकत नाही.

६) अनेकदा असं बघायला मिळतं की, महिलांना देखील पुरुष पोलीस अटक करतात. पण कायद्यानुसार कुठलाही पोलीस अधिकारी महिलेला अटक करू शकत नाही. तर त्यासाठी स्त्री पोलीस असणे गरजेचं असते. तसंच सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत स्त्रियांना अटक केली जाऊ शकत नाही.

७) एखादा कायदा तोडल्यावर जर तुम्हाला त्याकरिता दंड भरावा लागला असेल तर त्या दिवशी तुम्हाला पुन्हा ट्राफिक पोलिसांनी पकडलं तर दंड भरावा लागत नाही. पण याचा अर्थ असा नाही की, एकदा दंड भरल्यावर तुम्ही वारंवार कायदे मोडायला मोकळे झालात.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा