Advertisement

शनिवारी मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता


शनिवारी मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता
SHARES

राज्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाळी वातावरण असून, शनिवारी ९ जानेवारी रोजी मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच, येत्या मंगळवार १२ जानेवारीपासून थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि मराठवाड्यात विजेच्या गर्जनेसह येत्या तीन दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागानं ७ ते ९ जानेवारीपर्यंत १२ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात केला होता. हवामान विभागानं जारी केलेल्या अलर्टनुसार, औरंगाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाण्यात जोरदार पावसाचा इशारा दिला होता.

शनिवारी मुंबईत मध्यमस्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर, १२ जानेवारीनंतर तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसपर्यंतची घट होण्याची शक्यता असेल. यामुळे थंडीत वाढ होऊ शकते.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात ९ जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात ८ जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ७ ते ९ जानेवारी या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली, ८ जानेवारीला नाशिक, औरंगाबाद, ८ आणि ९ जानेवारीला मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर ८ आणि ९ जानेवारीला उत्तर महाराष्ट्र मध्ये, कमाल तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

८ आणि ९ जानेवारीला मुंबईसह उपनगरात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर ८ आणि ९ जानेवारीला उत्तर महाराष्ट्र मध्ये, कमाल तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मुंबईचं तापमान २४ अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा