पश्चिम द्रुतगती मार्गावर खड्डे

दहिसर - ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे पश्चिम द्रुतगती मार्गाची दुरवस्था झाली आहे.

बोरिवलीमधून दहिसर चेकनाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर दहिसर पूर्व येथील गोकुलानंद हॉटेलसमोर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला आहे.

व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे फ्लायओव्हर ब्रिजवरून खाली उतरल्यावर चेकनाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डा पडलेला आहे. अनेक दुकाकी चालक या खड्ड्यात अडखळून पडले आहेत. मात्र अद्याप हा खड्डा बुजवण्यात आलेला नाही.

Loading Comments