Advertisement

मुंबईतील ब्रिटिशकालीन फेररे पूल वाहतुकीसाठी बंद

मुंबईतील चर्नी रोड आणि ग्रॅण्ट रोड दरम्यानचा ब्रिटिशकालीन फेररे उड्डाणपूल बंद करण्यात येणार आहे.

मुंबईतील ब्रिटिशकालीन फेररे पूल वाहतुकीसाठी बंद
SHARES

मुंबईतील चर्नी रोड आणि ग्रॅण्ट रोड दरम्यानचा ब्रिटिशकालीन फेररे उड्डाणपूल बंद करण्यात येणार आहे. या ठिकाणी नवीन पूल उभारण्यात येणार आहे. या नव्या पूलाच्या बांधकामासाठी १६ जानेवारी रोजी मध्यरात्रीपासून हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तसंच, याठिकाणी नवीन पूल उभारण्यात येणार असून, साधारण ६ महिन्यांच्या कालावधी लागणार असल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे.

पुनर्बाधणीसाठी हा उड्डाणपूल १५ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार होता. मात्र, पूल बंद करण्याआधी त्यावरील विविध सरकारी यंत्रणा, खासगी कंपन्यांच्या केबल्स, वायर १४ जानेवारीपर्यंत काढण्याच्या सूचना पश्चिम रेल्वे प्रशासनानं केल्या होत्या. ती कामे अद्यापही झालेली नाहीत. त्यामुळे १६ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून हा उड्डाणपूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेला हा पूल महिन्यापूर्वी अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला. आता या पुलावर हलक्या वाहनांनाही बंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीवरही मोठा परिणाम होण्याची चिन्हं आहेत. तसंच, हा पूल वाहतूकीसाठी महत्वाचा असल्यामुळं चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड परिसरातील वाहनचालकांना मनस्ताप होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्नी रोड आणि ग्रॅण्ट रोड स्थानकादरम्यान असलेला फेररे उड्डाणपूल १९२१ साली बांधण्यात आला.

हा पूल दुरूस्तीसाठी बंद करण्यात आला असला तरी, प्रवाशांची व चाकरमान्यांची गैरसोय लक्षात घेऊन लवकरात लवकर बांधकाम करण्यात यावं अशी मागणी नागरिक करत आहेत. त्याचप्रमाणं वाहतुकीसाठी पर्यायी मार्गावरून जाण्यासाठी चारमान्यांना तासभर अगोदरच घर सोडावं लागणार आहे. 

मुंबई सेन्ट्रल रेल्वे हद्दीतील बेलासिस उड्डाणपूल, दादर स्थानक हद्दीतील टिळक उड्डाणपूल, महालक्ष्मी स्थानकाबाहेरील उड्डाणपूल, रे रोड स्थानकाजवळील उड्डाणपूल, करी रोड व घाटकोपर स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे सध्या सर्वेक्षण सुरू आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच उड्डाणपुलांची पुनर्बाधणी करणं गरजेचं आहे का हे स्पष्ट होणार आहे. रेल्वे मंत्रालय, मुंबई पालिका, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट कॉपरेरेशन लिमिटेडकडून या पुलांचे काम करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

एसटी कर्मचाऱ्याचा बसची दुरुस्ती करताना मृत्यू

ईस्टर्न फ्री वेला विलासराव देशमुखांचं नाव



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा