Advertisement

एसटी कर्मचाऱ्याचा बसची दुरुस्ती करताना मृत्यू

एसट कर्मचाऱ्याचा कामावर असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

एसटी कर्मचाऱ्याचा बसची दुरुस्ती करताना मृत्यू
SHARES

एसट कर्मचाऱ्याचा कामावर असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बी. बी. भिसे असं या कर्मचाऱ्याचं नाव असून, मंगळवारी ही घटना घडली. कुर्ला नेहरूनगर कार्यशाळेत एसटी बस दुरुस्त करत असताना जॅक निखळल्यानं बी. बी. भिसे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

मंगळवारी ४.३० वाजण्याच्या सुमारास कार्यशाळेत भिसे आणि सहकारी आशीष गिरकर हे एसटी बसच्या (एम.एच. १८ बी.टी. ४४५३) दुरुस्तीचं काम करत होते. ही बस जॅकवर उभी करण्यात आली होती. जॅक निखळल्यानं अचानक बस पुढे गेली. यावेळी बसखाली काम करत असलेले भिसे चिरडले गेले. हा प्रकार पाहताच कार्यशाळेतील अन्य कर्मचाऱ्यांनी धाव घेत दगड, ओटी लावून गाडी थांबवली. बसखाली चिरडलेल्या भिसे यांना कुर्ला येथील सुराणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

चालक असलेले भिसे दोन महिन्यांपूर्वीच एसटीत सहायक अतांत्रिक पदावर नियुक्त झाले होते. डोळ्याला इजा झाल्यानं त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आलं होतं. बी. बी. भिसे यांच्या पश्चात पत्नी आणि १७ वर्षीय व १० वर्षीय २ मुले आहेत. काहीच दिवसांपूर्वी रामानंद पाटकर या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. लिफ्टमध्ये दुरुस्तीचं काम करत असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचं परिवार मदतीच्या प्रतीक्षेत असतानाच आणखी एका एसटी कर्मचाऱ्यांचा कामावर असताना मृत्यू झाला.



हेही वाचा -

एसटी कर्मचाऱ्याचा बसची दुरुस्ती करताना मृत्यू

ईस्टर्न फ्री वेला विलासराव देशमुखांचं नाव



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा