Advertisement

अस्वच्छ रेल्वे स्टेशनसाठी जबाबदार कोण?


अस्वच्छ रेल्वे स्टेशनसाठी जबाबदार कोण?
SHARES

जागोजागी वेफर्सचे रॅपर, कागदाचा कचरा, पाण्याच्या बाटल्या, पानाच्या पिचकाऱ्या आणि उकिरडा. ही दुरवस्था आहे दादर स्टेशनची. फक्त दादरच नाही तर मुंबईतल्या सर्वच स्टेशनची ही अवस्था. नुकत्याच झालेल्या सर्वेवरून मुंबई स्टेशन किती अस्वच्छ आहेत हे समोर आलं आहे. सर्वेतील आकडेवारी पाहून तर धक्काच बसेल. सांस्कृतिक वारसा जपणारं दादर स्टेशन सर्वात अस्वच्छ असल्याचं या सर्वेत म्हटलंय. त्यातल्या त्यात वांद्रे स्टेशन स्वच्छतेच्या बाबतीत १५ व्या क्रमांकावर आहे. हा सर्वे जंक्शनचा होता. पण जर आपण लोकल स्टेशनची अवस्था पाहिली तर ती जंक्शन्सपेक्षा काही फारशी वेगळी नाही. ही परिस्थिती आपल्यावर का ओढवली असेल? याचा कधी विचार केला आहे? यासाठी फक्त रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे का? असे अनेक प्रश्न पडतात.

रेल्वे प्लॅटफॉर्म अस्वच्छ करण्यास रेल्वे प्रशासन आणि प्रवासी दोघेही जबाबदार आहेत. कचरा पेटी खरेदी व्यवहारात घोटाळा होत आहे. स्टेशनवर जेवढ्या कचरापेट्या हव्यात तेवढ्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना कचरा ट्रॅकवर किंवा प्लॅटफॉर्मवर टाकावा लागतो. वेस्टर्न रेल्वे स्टेशन्सची अवस्था जरा बरी आहे. पण सेंट्रल आणि हार्बरची अवस्था अतिशय दयनीय आहे. रेल्वे देखभाल करण्यात अयशस्वी ठरत आहे

- भावेश पटेलसामाजिक कार्यकर्ता

'स्वच्छ भारत' किंवा 'स्वच्छता की ओर एक कदम' हे स्लोगन देऊन काही होत नाही. तुमचं स्टेशन स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही स्वत: काय करता हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मध्यंतरी 'हमारा स्टेशन हमारी शान' हा नवा उपक्रम रेल्वेकडून राबवण्यात आला. त्यांच्या या उपक्रमात कॉलेज स्टुंडंट्सनी साथ दिली. रंगरंगोटी करून स्टेशन्स चांगली सुशोभित केली. पण त्यांनी एवढी मेहनत करून केलेलं सुशोभिकरण व्यर्थ झालं. प्लॅटफॉर्म आणि स्टेशनच्या ब्रीजवर काढण्यात आलेल्या चित्रांवर पानाच्या पिचकाऱ्या मारल्याचं चित्र सर्रास दिसतं. अगदी सुशिक्षित नागरिकसुद्धा असे वागतात. त्यांना टोकावं तर वाद घालतात. तुम्हाला काय करायचं? तुम्ही कोण सांगणारे? असंही ऐकवायला कमी करत नाहीत. नाहीतर रेल्वेनं साफसफाई करायला लोकं ठेवली आहेत की, मग मी तर करणार घाण? अशी उर्मट उत्तरंही दिली जातात. स्टेशन आणि आसपासच्या परिसरात तुम्ही कचरा टाकता. कसं आहे आपलं गणित ठरलंय. काही झालं की समोरच्यावर बोट उचलायचं आणि स्वत:ची जबाबदारी झटकायची. समोरचा स्वत:ची जबाबदारी नीट पार पाडत नाही मग मी का समाजसेवा करायची? असा काहींचा प्रश्न असतो. तर रेल्वे स्टेशनवर नीट कचरा पेटीही नसतात, अशीही प्रवाशांची तक्रार असते. रेल्वे चुकतेय मग आपणही नाही का चुकत? कचरा पेटी नसली तर कचरा प्लॅटफॉर्मवर टाकणे कितपत योग्य आहे? तुम्ही तो कचरा तुमच्या बॅगेत ठेवू शकता किंवा जिथे कचरा पेटी दिसेल तिकडे कचरा टाकावा. काही प्रवाशांनी तर प्लॅटफॉर्मवरील स्टॉल धारकांना स्टेशनवरील अस्वच्छतेसाठी जबाबदार धरलं. पण यासंदर्भात स्टॉल धारकांशी बातचित केली असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले

स्टेशनवर रेल्वे प्रशासनाकडून कचऱ्याचे डबे ठेवले जातातच. शिवाय प्रत्येक स्टॉलधारक डबे ठेवतो. पण त्यात सर्वच कचरा टाकतात असं नाही. काही जणं खाली टाकतात. शिवाय स्टॉलजवळ आम्ही झाडू मारून साफसफाईही करतो

- स्टॉलधारक

कचरा टाकणे किंवा परिसर घाण करणे यामुळेच परिसर अस्वच्छ होतो असं नाही. तर परिसरात असणारी उघडी गटारं, प्लॅटफॉर्मवर साचलेलं पाणी, प्लॅटफॉर्मवरील अस्वच्छ शौचालये अशी अनेक कारणं अस्वच्छतेसाठी जबाबदार आहेत. ही जबाबदारी मात्र रेल्वेची आहे. ती रेल्वेकडून नीट पार पाडली जात नाही.

रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या अस्वच्छतेमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. टीबी, वायरल फीवर असे अनेक आजार पसरतातहे सर्व आजार थुंकल्यामुळे अधिक पसरतात.

- डॉसागर कजबजे  

आता कळलं अस्वच्छता तुमच्यासाठी किती धोकादायक ठरू शकते ते? फक्त धोकादायकच नाही तर ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहेतुम्ही जरी अस्वच्छता पसरवत नसाल तरी जे पसरवतात त्यांना कचरा करण्यापासून परावृत्त कराकुणी कचरा टाकत असल्यास किंवा थुंकत असल्यास त्याच वेळी त्यांना टोका. कारण जेवढी रेल्वेची जबाबदारी आहे तेवढीच आपलीही जबाबदारी आहेआता निर्णय तुमचा आहे. मुंबईचे स्टेशन स्वच्छ ठेवायचे की अस्वच्छ.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा